KINWATTODAYSNEWS

मुख्यधिकारी यांच्या आश्वासनानंतर नगरसेविकेचे उपोषण मागे.

किनवट ( प्रतिनिधी )
किनवट नगरपरिषद वार्ड क्रमांक एक मधील विविध समस्या च्या संदर्भात उपविभागीय कार्यालय किनवट समोर मागील तीन दिवसांपासून सुरू असलेले वार्ड क्रमांक एक च्या नगरसेविकेचे उपोषण मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या आश्वासनानंतर आज मागे घेतले.
सविस्तर वृत्त असे की, किनवट नगरपरिषद वार्ड क्रमांक एक मधील नगरसेविका जिजाबाई मेश्राम यांनी आपल्या वार्डातील आदिवासी समाजातील नागरिकांच्या समस्या व इतर नागरिकांच्या समस्या, प्रामुख्याने रस्ते, वीज, घरकुल, पाणीपुरवठा व स्मशानभूमीचा प्रश्‍न आदी समस्यांचे सहित, वार्डात होणारी सर्व विकासात्मक कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी येथील उपविभागीय कार्यालयासमोर मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते.तहसिलदार तथा मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव यांनी वार्डतील सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील आदिवासींसाठी स्मशानभूमीचा प्रश्न तसेच तेथील नागरिकांच्या विज, रस्ते पाणीपुरवठ्याचा प्रश्न व इतर समस्या सोडविल्या जातील असे अश्वासन दिल्यानंतर नगरसेविका जिजाबाई मेश्राम यांनी आपले उपोषण मागे घेतले.
नागरिकांच्या प्रश्नांबाबत लढणाऱ्या जिजाबाई मेश्राम उत्कृष्ट नगरसेविका असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. वार्ड क्रमांक एक सहित किनवट चा विकासासाठी अपण कटिबद्ध असल्याचे सौ.मेश्राम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अध्यक्ष ,आदिवासींचे जेष्ठ नेते नारायणराव सिडाम,अंनद मंच्छेवार , साजिद खान,जितेंद्र कुलसंगे,गोपाल कनाके, अभियंता अभिजीत मिरकले, बिराजदार, संदिप कन्नाके किशन पेरकलवार, अर्जुन सातपुते रुक्मिणीबाई बडेवाड,सुवर्णा जगले, सुशीला फोफसे,लक्ष्मीबाई बोडारकर,निर्मला सुदेवाद मंगला गारशेटवार मालका सुधेवाद यांची उपस्थिती होती.

359 Views
बातमी शेअर करा