KINWATTODAYSNEWS

घुंगराळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसह दादासाहेबगायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत कार्यशाळा संपन्न ; तर कर्मवीर कर्मवीर दादासाहेब सबळीकर –योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.20.जिल्यातील नायगाव तालुक्या मधील मौजे घुंगराळा येथे ग्रामपंचायत पंचायत कार्यालयात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमा अंतर्गत तालुक्यासह जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी सुद्धा घुंगराळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न झाल्याच्या नंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेची कार्यशाळा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती यावेळी गावच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधर जोगेवार यांचे सरपंच प्रतिनिधी मोहनराव जोगेवार हे अध्यक्षस्थानी होते तर समाज कल्याण निरीक्षक कैलास मोरे, रमेश नागुलवार विविध सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी, लाभार्थी मोठया संख्येने उपस्थिती होते

तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे सदरील कार्यशाळेचे आयोजन सरपंच प्रतिनिधी श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न करण्यात आली समाज कल्याण विभाग नांदेडचे समाज कल्याण निरीक्षक कैलास मोरे यांनी योजने सदरच्या योजने फायदा कसा असतो कसा करता येतो यावर सखोल माहिती लाभार्थीना दिली आणि यावेळी समाज कल्याणचा गोरगरीब लोकांनी सदरच्या योजनेचा लाभ घेण्याचे यावेळी मोरे यांनी आवाहन केले असून दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी परबता हणमंते,यांच्या अन्य लाभार्थी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजने लाभ घेतले असल्याचे यावेळी समाज कल्याण निरीक्षक मोरे यांनी सांगितले आहे
घुंगराळा येथे ग्रामपंचायत आनंदराव यमलवाड सेवा निवृत्ती कृषीअधिकारी, सौ किशनबाई तुळशीराम कळकटवाड, ग्रामपंचायत सदस्या, सदाशिव जक्केवाड, बालाजी तुरटवाड, शंकर पाटील ढगे, चांद पाशा शेख, विलास पाटील ढगे, नागेश बोडंले, माधव यमलवाड, लक्ष्मण कासराळे, विठ्ठल सूर्यवंशी, पोचिराम गजभारे, रमेश आढाव, राजेश पाटील गंगाधर पाटील ढगे,संभाजी सूर्यवंशी, हणमंतराव बाबाराव शिंदे, ग्रामविस्तार अधिकारी रमेश गजभारे, रामचंद्र पाटील ढगे,रामदास ननुरे,श्रीमती धोंडाबाई सुर्यवंशी,श्रीमती सारजाबाई सुर्यवंशी, पुंडलीक आढाव, दिंगाबर गंगासागरे दिंगाबर गंगासागरे आदी वेळी उपस्थित होते या सदरच्या कार्यक्रमात कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेचा लाभ घुंगराळा गावातील लाभार्थीनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

58 Views
बातमी शेअर करा