किनवट ( बातमीदार ) :
भारत टारपे विक्रीकर अधिकारी यांच्या संकल्पनेनुसार पुस्तक यात्रा ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने शासकिय आश्रम शाळा.बोधडी (बु.) येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना तीस हजाराची स्पर्धा परिक्षेचे पुस्तकं वाटत करण्यात आले.
पुस्तक यात्रा ग्रुप तर्फे बिरसा अॉकाडमी पुसद, शासकिय आश्राम शाळा सिंताखंडी , बेल्लोरी (धा.) वासी, शा.आ.शा.जामगव्हान,इत्यादी जवळपास25 गावात ही पुस्तक यात्रा पोहोचली आहे. या ग्रुपला विविध क्षेत्रातील मान्यवरानी सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. बहुतांश देणगीदार हे आश्रम शाळेतील माजी विद्यार्थी आहेत.
सामाजिक प्रगतीचा ध्यास घेऊन गुरूपचे कार्य भारत टारपे साहेब राज्यकर अधिकारी तसेच तुकाराम भिसे, कोठुळे , श्रीहारी हुरदुके , कमल फोले सदाशिवराव आसोले , दिगांबर डवरे इत्यादी चा सहभाग आहे.वाचेल तर टिकेल इत्यादी उदिष्ट ठेवून पुस्तक वाटपाचा कार्यक्रम घेन्यात आला. किनवट प्रकल्पा अंर्तगत शा.आ.शाळा पैकी मुलीची शाळा म्हणून बोधडी बु. या शाळेची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास नियोजन अधिकारी मा.साबरे साहेब यांनी विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे महत्त्व विषदकेले तसेच व्यक्तीचा व्यक्तीमहत्व विकास शिक्षणामुळे होते. विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचे वाचन करावे व वाचलेला महत्त्वाचा भाग नोंदी करून ठेवावा सागितले.
केंद्रे एन पी. स.प्र.अ. यांनी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रम येऊन आंनदा झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच पुस्तक यात्रा ग्रुप तर्फे शंकर डोईफोडे पदोन्नत मु.अ. यांनी यात्रा गुरुप संबंधी माहिती देऊन या शाळे विषयी माझी विद्यार्थ्यां म्हणून पर्वीचा .शाळा व,आता ची शाळा तसेच विद्यार्थ्यांना मिळानार्या सोई सुविधा खूप चांगल्या असलेल्या ब़दल आंनद व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यां नी कोनती ही तक्रार न करता आपल्या शिक्षणा कडे लक्ष द्यावे व,आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे सांगितले.
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी खुडे यांनी मार्गदर्शनात सर्वाच विद्यार्थ्यांनी आपण आंनदात आहत का ! अशा प्रश्न करून .ज्ञानरचनावादा नुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनीत पुर्ण क्षमता आसुन आपण इतर विद्याथीनी पेक्षा कमी नाहीत त्या साठी सर्व विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवावा . आपले आई-वडील व,आपल्या शाळेचे नाव उंचवावे मी व ज्या गुरुप मधिल आपल्या समाज बांधवांनी ही पुस्तके दिली ते सुध्दा आश्रम शाळेतून शिक्षण घेतलेले माझी विद्यार्थ्यां आहेत.आश्रम शाळास आपले सुद्धा काही तरी देणे लागते म्हणून हे पुस्तके दिलेले आहेत. उन्हाळ्यी सुट्टी मध्ये आपल्या गावी पुस्तके घेऊन जावून वाचन करावे. तसेच विविध स्पर्धा परीक्षात भाग घेऊन या पुस्तकाचा वापर करावा.व आपले भावी जीवन सार्थक करावे. असे अहवान केले.
कार्यक्रमचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शाम मुंडे यांनी पुस्तक ग्रुपचे कौतुक केले .व सर्वाचे अभिनंदन करून आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून नेहमीत घेवदेव करण्यात येईल.तसेच अवांतर वाचना विद्यार्थ्यांना साठी वेळ देण्यात येईल असे सुध्दा सांगितले. कार्यक्रम चे प्रस्तावित मुंडे सरानी महामानव व शिक्षणा बदल सखोल माहिती दिली. तसेच दोन विद्यार्थ्यांनी सुद्धा आम्ही या पुस्तकाचा वापर नेहमीत करूत व पुस्तके शाळेला दिल्या बदल आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष मुंडे संरनी केले.या कार्यक्रमास शा.व्या.स.सटवाजी देशमुखे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
चौकट :
“पुस्तकं वाटप करण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे. वैयक्तिक मार्गदर्शन मिळावे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली तर ते स्पर्धा परिक्षेत टिकेल. इत्यादी उद्देश ठेवून पुस्तक वाटप करण्यात आली. ”
– भारत टारपे (विक्रीकर अधिकारी)
संकल्पक : पुस्तक यात्रा ग्रुप महाराष्ट्र