KINWATTODAYSNEWS

किनवटच्या वैभवात भर घालणार्‍या हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघूनाथशहा व्यासपिठासह प्रांगणाकडे सत्ताधारी भाजपप्रणित प्रशासनाचे अक्षम्य दूर्लक्ष?

किनवट/प्रतिनिधी— किनवटच्या वैभवात भर घालणार्‍या हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघूनाथशहा व्यासपिठासह प्रांगणाकडे सत्ताधारी भाजपप्रणित प्रशासनाचे अक्षम्य दूर्लक्ष झाल्यानंतर हाच मुद्दा काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमर राजुरकरांंनी विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित केला होता. व्यासपिठाची दुरुस्ती आणि प्रांगणाचे सुशोभीकरण अभिप्रेत असून अतिक्रमनमुक्त करण्याचा प्रश्न मांडल्यानंतरचा सहा महिन्याचा काळ लोटला परंतू अद्यापही अवस्था जैसे थेच आहे. १८ एप्रिल रोजी किनवट च्या आमदारांनी राज्यपालांकडे सादर केलेल्या मागणीपत्रात हा प्रश्न उपस्थित केलेला दिसत नाही. त्यांच्याच जनसंपर्क कार्यालया समोरच मोठमोठ्या सभांसह विविध कार्यक्रमांचे वैभवशाली एकमेव हेच मैदान असल्याने त्यास अनन्य साधारण महत्व आहे.

शहरातील हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघूनाथशहा मैदान हे तालुक्याचे ह्रदयस्पंदन आहे. निवडणुकांच्या सभा असोत की सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम असोत ते हेच मैदान रंगवतात. अशा वैभवशाली मैदानाला राजकारण्यांनी सोयीच्या राजकारणासाठी अतिक्रमनाचे ग्रहन लाऊन विद्रूपीकरण केल्याच्या तक्रारी वाढल्या. मध्यंतरीतर सागवान लाकडाच्या मालकीपट्याचे आगारच बनले होते.

किनवट नगर परिषदेवर भाजपाची सत्ता आणि आमदारही भाजपाचेच आहेत. यांच्याच काळात मैदान आणि व्यासपिठाचे मजबुतीकरण तसेच सुशोभीकरण अपेक्षित आहे. दूर्लक्षातून ही परवड निश्चीतच झालेली दिसत नाही. आमदार राजुरकरांनी हाच मुद्दा हेरुन मागच्या हिवाळी अधिवेशनात तारांकीत (प्रश्न क्र.११३२४) केला. त्यावर कक्ष अधिकारी उ.ना.सार्दळ यांनी आयुक्त तथा संचालक न.प.प्र.संचालनालय मुंबई आणि नांदेड जिल्हाधिकार्‍यांना २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत स्वयंस्पष्ट वस्तुनिष्ठ टिप्पणीसह अहवाल मागवला. मात्र अद्यापही कसलीही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यासाठी जनांदोलन छेडण्याची आवश्यकता आहे काय ? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

242 Views
बातमी शेअर करा