नांदेड:-(प्रतिनिधी)
लोहा पोलीस ठाणे हद्दी अंतर्गत पांगरा (तळ्याचे)तालुका कंधार येथे एका 22 वर्षीय विवाहितेवर अतिप्रसंग केल्याची घटना दिनांक 15 रोजी शुक्रवारी पहाटे दोन वाजता च्या सुमारास घडली या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे कंधार तालुक्यातील मौजे पांगरा तळ्याचे हे गाव लोहा पोलीस ठाणे हद्दीत येते येथील बावीस वर्षे विवाहिता ही दिनांक 14 रोजी विजेच्या भारनियमनामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने उकाड्यामुळे अंगणात बाजेवर झोपली होती. 14 रोजी च्या मध्यरात्री दोन वाजता घराच्या बाहेर आरोपी शिवदर्शन रघुनाथ बेद्रे वय 25 वर्ष राहणार पांगरा (तळ्याचे) तालुका कंधार याने येऊन सदरील महिलेचे तोंड दाबून तिला ओढत नेले. बाजूला फिर्यादीच्या घराचे बांधकाम चालू आहे तेथे नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला सदरील विवाहितेस धक्काबुक्की आणि मारहाणही केली या प्रकरणी फिर्यादीने लोहा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपीविरुद्ध cr no.83/2022 कलम 376,323 ipc गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गफार शेख पुढील तपास करीत आहेत परंतु चार ते पाच दिवसाचा कालावधी होऊन गेला तरी आरोपी अजूनही मोकाटच फिरत आहे.लोहा पोलीसांचे आरोपीला अटक करण्याचे चक्र जोराने का फिरत नाहीत, तपासाचे चक्र मंदावल्या सारखे वाटत आहेत.
लोहा पोलीस हे नेहमीच्या पद्धतीने आरोपीस पाहुण्याची वागणूक देत आहेत त्यामुळे गावात मोकाट फिरणाऱ्या लिंगपिसाट आरोपीची दहशत बसली आहे. लहान, वयौव्रद्ध महिलांना गावात फिरणे कठीण झाले आहे. सदरील आरोपी हे गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे पोलीस कारवाई करण्यास धजत नाहीत तर गावकर्यांच्या म्हणण्यानुसार लोहा पोलिसांची आरोपी सोबत मैत्रीचे संबंध असल्यामुळे आरोपीस अटक होत नाही अशी चर्चा आहे.
*पांगरा येथे विवाहितेवर अतिप्रसंग करणारा आरोपी अद्यापही फरारचं…* लोहा पोलिसांना आरोपीचा सुगावा काही लागेना…
73 Views