KINWATTODAYSNEWS

गंजगावच्या रेती ठेकेदाराचा असा हा प्रताप;परवाना एका ठिकाणचा उत्खनन दुसऱ्याच ठिकाणी सुरु…

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.16.जिल्यातील बिलोली तालुक्या मधील मौजे गंजगाव येथील रेती घाटाचे वास्तव चित्र पाहिले तर मांजरा नदी पाञात दहा ते पंधरा फुटा पर्यत खड्डे पाडले आसुन महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारा मुळे ठेकेदाराला प्रशासनाने एका गटात उत्खनन करण्यासाठी परवानगी दिली असताना सुद्धा सदरच्या ठेकेदाराने दिलेल्या गटातील ठेका सोडून दुसऱ्या गटात रेतीचे उत्खनन करत असल्यामुळे नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटणकर यांच्यासह बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्या बरोबर तहसीलदार व मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांनी गंजगावच्या रेती घाटात होत असलेल्या तुफानी रेती उत्खननाकडे लक्ष देतील का असा प्रश्न जनतेला पडला असून प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे रेती ठेकेदाराला रेतीचे उत्खनन करण्यासाठी एका गटाची परवानगी दिली असताना सुद्धा ठेकेदार यंञाच्या साह्याने रेती जमा करुन प्रशासन आपल्या खिशात असल्या सारखे वागत आहे दुसऱ्या गटात रेतीचा अवैध उपसा करणे चालु असल्यामुळे शासकीय यंत्रेनेचे पथक नावालाच असल्यामुळे असा प्रकार होताना दिसून येत असताना सुद्धा प्रशासन ठेकेदाराला पाठिशी घालत आसल्याची चर्चे ग्रामस्थामध्ये होत आहे

गंजगाव रेती घाटाचे विद्रूप सदरच्या नदीने धारण केल्यामुळे काही दिवसात मांजरा नदीला वाळंवटाचे स्वरुप येण्यास वेळ लागणार नाही तालुक्यातील गंजगाव येथे होत असलेल्या रेती घाटाकडे बिलोली महसूल प्रशासन दुर्लक्ष पणा करत आसल्यामुळे राञ दिवस जेसीबी यंञाच्या साह्याने रेतीचा उपसा सुरु आहे रेती ठेकेदाराकडून होत आसलेले अवैध उपसा महसुल प्रशासनाला दिसत नाही का ? अशा गंभीर बाबीकडे बिलोलीचे तहसील श्रीकांत निळे या बाबीकडे डोळेझाक का करीत असून उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्यासह तहसीलदार व मंडळाधिकारी तलाठी यांच्या कडुन ठेकेदारावर कार्यवाही करतील का?महसूल विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्यामुळे ठेकेदारांनी सदरचा रेतीघाटावर ठेकेदाराची मुजोरी वाढली असून दुसऱ्या गटात रेतीचे उत्खनन करत असल्याचे वास्तव चित्र बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे पाहावयास मिळत असून या कडे जिल्हाधिकाऱ्यानी लक्ष देतील का ? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांना गंजगाव रेती घाटातील ज्या गटाचा प्रशासनाने परवाना दिला त्या गंजगाव रेती घाटातील गटाची व रेती ठेकेदार दुसऱ्या गटातून अवैध उत्खनन करत असल्यामुळे या सर्व गटाची माहिती घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी सचिन गिरी व तहसिलदार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवु शकला नाही सदरची माहिती मिळाली नसल्यामुळे बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील रेती घाटातील ठेकेदारांनी अवैध रित्या रेतीचे उत्खनन करून प्रशासनाच्या तिजोरीला चूना लावीत रेती उत्खनन चालु ठेवले आहे ठेकेदारांनी स्वतःची तिजोरी भरून घेण्याचा सपाटा गंजगाव रेती घाटावर लावलेले आसुन पण शासनचाचे लाखो रुपये महसुल बुडत आहे.

अश्या गंभीर बाबाकडे जिल्हाधिकारी सह उपविभागीय अधिकारी सचिन गिरी तहसिलदार श्रीकांत निळे यांनी रेती ठेकेदारावर काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

115 Views
बातमी शेअर करा