*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.16.नांदेड जिल्ह्यात घडलेल्या उद्योजक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर आज 12 दिवस झाले आहेत.पण अद्याप कांही एक धागा दोरा सापडलेला नाही.याबद्दल नांदेड पोलीसांशी माझे कांही वैर नाही पण स्थापन केलेली एसआयटी या हत्येचा तपास लावू शकत नाही.म्हणून हा गुन्हा केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे वर्ग करावा असे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
आज बोलवलेल्या पत्रकार परिषदेत खा.प्रताप पाटील चिखलीकर,डॉ.संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख,प्रविण साले, दिलीप कंदकुर्ते,प्रविण पाटील चिखलीकर संजय बियाणींचे जावई मयुर मंत्री,माणिकराव मुकदम,माधवराव उच्चेकर, किशोर देशमुख,कोलंबीचे सरपंच प्रल्हाद बैस यांची उपस्थिती होती.
5 एप्रिल रोजी संजय बियाणींची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली. त्यानंतर आज 12 दिवस झाले आहेत. पण या हत्येबाबत एकही धागा दोरा पोलीसांना सापडलेला नाही.या हत्येच्या तपासासाठी जी एसआयटी स्थापन करण्यात आली.त्यात आम्हाला अजून वेळ द्या असे ते सांगत आहेत. म्हणजे स्थापन केलेल्या एसआयटीकडून या गुन्ह्याचा तपास लागणे शक्य नाही.म्हणून हा गुन्हा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा असे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.नांदेड जिल्ह्यात दुसरा संजय बियाणी होवू नये कारण संजय बियाणी हा सामाजिक दायीत्व जपणारा व्यक्ती होता. जवळपास 400 ते 500 कुटूंबियांचे ते पालक होते. त्यामुळे या घटनेचा तपास लागला नाही तर नांदेडमध्ये कोणी नवीन उद्योजक येणार नाहीत.मी या संदर्भाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून सांगितले आहे, त्यांनी तपास करण्याबद्दल मला ग्वाही दिली आहे.
या गुन्ह्यात प्रताप पाटील चिखलीकरचे नाव असेल तरीही या गुन्ह्याची उकल व्हावी अशीच माझी इच्छा आहे.म्हणूनच मी आज बोलतो आहे.एसआयटी रिंदाच्या नावावर गोल-गोल फिरत आहे. मुळात तो या घटनेचा गुन्हेगार आहे की, नाही याचा तपास लागत नाही.
माझा पोलीसांवर आरोप नाही पण संजय बियाणीचे मारेकरी पोलीसांनी पकडले पाहिजेत अशीच माझी इच्छा आहे.या संदर्भाने नांदेड जिल्ह्यात कांही पोलीस अधिकारी दिघोरे झाले पाहिजेत. यावर प्रश्न विचारला असता कोण-कोण दिघोरे आहेत हे सर्वांना माहिती असल्याचेउत्तर दिले.तुमच्या मताने किती दिवसात संजय बियाणी हत्येचा तपास पुर्ण व्हावा असे तुम्हाला वाटते असा प्रश्न विचारला असता त्यांनी आता वेळ संपला आहे असे उत्तर दिले.एसआयटी निर्माणच का केली.असा प्रश्न खा.चिखलीकर यांनी उपस्थित केला.येत्या 20 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.
या आंदोलनात संजय बियाणी बद्दल प्रेम असणारे आणि या हत्याप्रकरणाला विरोध असणारा प्रत्येक व्यक्ती धरणे आंदोलनात सामील होवू शकतो.त्या सर्वांनी 20 तारेखच्या धरणे आंदोलनात यावे असे आवाहन खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.
संजय बियाणी,सुरेश राठोड यांची सुरक्षा काढण्यात आली आणि कांही चाटूकारांना सुरक्षा बहाल आहे असे खा.चिखलीकर म्हणाले. याबदल पोलीस विभागाकडे माहिती घेतली असता अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली.सन 2020 मध्ये माजी पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी ज्या लोकांकडे पैसे भरण्याची क्षमता आहे त्यांनी पैसे भरून सुरक्षा घ्यावी असे पत्र संजय बियाणी यांना दिले होते.
त्यानंतर संजय बियाणीने स्वत:ला सुरक्षा मिळण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही,अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. असाच कांहीसा प्रकार सुरेश राठोड संदर्भाने पण घडला होता असे सांगण्यात आले.
काल दि.15 एप्रिल रोजी कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पुर्णपणे जळालेली दुचाकी गाडी सापडली बियाणीची हत्या करणाऱ्या आरोपींनी वापरलेली दुचाकी याची कंपनीची होती. ज्या कंपनीची गाडी जळालेल्या आवस्थेत सापडलेली आहे. बियाणी यांची हत्या झाली त्यावेळेसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी गाडी दिसते ती प्लसर 220 प्रकारची आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीचा रंग लाल आणि काळा आहे.
जळालेल्या आवस्थेत सापडलेल्या गाडीचा रंग तर कळू शकला नाही पण ती जळालेली होती.या संदर्भाने त्या गाडीचा चेसीज नंबर जळाला नव्हता.त्या आधारे घेतलेल्या माहितीनुसार ही जळालेली गाडी 23 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली आहे.
बियाणीवर हल्ला झाला ती तारीख 5 एप्रिल आहे.त्यामुळे या गाडीच्या संदर्भाने शंका तयार झाल्या आहेत.नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या गाडीच्या चोरी बाबतचा गुन्हा नमुद आहे. त्या गाडीमालकाचा पत्ता सुध्दा पोलीसांनी शोधला आहे.
पुढील सर्वकांही तपासाच्या कौशल्यावर आधारीत आहे.कारण चोरी झालेली गाडी आज पर्यंत कधीच जळालेली मिळाली अशी माहिती आम्हाला तरी नाही.