KINWATTODAYSNEWS

केंद्रं सरकारच्या जनविरोधी धोरनांच्या विरोधात मा.क.पा च्या वतिने निषेध दिवस पाळण्यात आला

किनवट ता.प्रतिनिधी:

मा.क.पा आणि जनसंघटनांच्या वतिने २६ मे रोजी देशव्यापी निषेधाची हाक देण्यात आली होती. या देशव्यापी हाकेला प्रतिसाद देत मा.क.पा, किसान सभेच्या वतिने किनवट तालुक्यात अनेक ठिकाणी काळे झेंडे लावत, मोदी सरकारचे प्रतिआत्तक पुतळे जाळत निषेध करण्यात आले.
सहा महिण्यापासुन सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत, तिन शेती विरोधी काळे कायदे रद्द करा,बेसुमार वाढणारी महागाईवर निंयञन आणा.लाॅकडाउन च्या काळात केरळ, तामिळनाडू च्या धरतीवर सर्व सामान्य लोकांना ७००० रु. जगण्यासाठि द्या, सर्व गरिब गरजुंना १० किलो राशन मोफत द्या, आरोग्य व्यवस्था सकक्षम करा,बेड-वेटिलेटेरं ची व्यवस्था करा,सर्वांना तात्काळ मोफत लस द्या, सर्व विद्यार्थीची शैक्षणिक शुल्क माफ करा, बेरोजगारांना बेरोजगार भत्ता द्या, खत -बियांनाचे वाढीवर भाव वापस घ्या या मागण्या घेऊन केद्रं सरकार च्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
ठिक ठिकाणी घरांवर काळे झेंडे लावण्यात आले. तथा प्रतिआत्मक मोदी सरकारचा पुतळा ठिक ठिकाणी जाळण्यात आले. किनवट येथे काॅ.अर्जुन आडे ,काॅ.जनार्दन काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तर तालुक्याभरात नंदगाव,शिवणी,लोखंडवाडी,सोनवाडी,पांगरी,तोटंबा, नागापुर, दिपलानाईक तांडा ,गोकुंदा, चंद्रुनाईक तांडा, बुरकुलवाडी, आप्पारापॆठ इत्यादी ठिकाणी जोरदार आंदोलन आणि निषेध करण्यात आले. या वेळी ठिक ठिकाणी झालेल्या आंदोलनात काॅ.अर्जुन आडे,काॅ.जनार्दन काळे,नंदकुमार मोदुकवार, प्रशांत जाधव,शेषराव ढोले,प्रभाकर बोड्डेवार, आनंद लव्हाळे, परमेश्वर गायकवाड, मनोज सल्लावार, इरफान पठाण, बालाजी, ब्रम्हा अंकुलवार, तानाजी राठोड, शिवाजी किरवले, स्टॅलिन आडे,यल्लया कोतलगाम ,प्रदीप जाधव, अमोल आञाम ,सुनिल राठोड, मनोहर आडे,पवन जेकेवाड, सुशील ढेरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

154 Views
बातमी शेअर करा