KINWATTODAYSNEWS

शहरात व परिसरात श्री राम नवमी उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात व शांततेत साजरा

किनवट ता.प्र दि ११ शहरात व परिसरात श्री राम नवमी उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला असुन शहरात दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी श्री रामनवमी निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हजारो भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला. शहरातील श्री राम मंदिरात सकाळच्या सत्रामध्ये पुजा अर्चा आरती आदि कार्यक्रम झाल्या नंतर युवकांच्या मोटारसायकल रॅलाचे आयोजन करण्यात आले होते ज्याला आमदार भिमराव केराम यांनी झेंडा दाखवत मार्गस्त केले. त्या नंतर श्री राम मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वर्षी श्रीनिवास सातुरवार यांचे रक्तदानाचे हे सलग ३२ वे वर्ष होते. त्यांनतर श्रीराम भक्त मंडळातर्फे भव्य महाप्रसाद भंडा-याचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा सुमारे ६ ते ७ हजार भाविकांनी लाभ घेतला.
मंदिर समितीचे पदाधिकारी माजी बांधकाम सभापती व्यंकट भंडारवार, व्यंकट सातुरवार गुरु स्वामी, भुमन्ना कोलावार स्वामी, गिरिष नेम्मानिवार, संतोष यलचलवार, देवन्ना काडेवार, गजानन बंडेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी सर्व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. जे शांततेत संपन्न झाले.
श्री राम नवमी निमित्त किनवट शहर व परिसर हे भगवामय करण्यात आले होते सर्वत्र भगवे ध्वज व पताका लावण्यात आले होते त्या करिता श्रीराम जन्म उत्सव समितीच्या पदाधिका-यांनी सुमारे दोन महिण्यापासुन अथक परिश्रम घेतले, स्वताःचा व्यवसाय सांभाळत अहोरात्र परिश्रम केल्याने यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन करता आले ज्याकरिता गणेश शर्मा, विक्रांत दगुलवार, क्रिष्णा कलकुंटलावार, अथर्व पेन्शनवार, राकेश तम्मलवार, विवेक भंडारवार, साई दुग्येलवार, साई सिरमवार, विवेक रुद्रावार, वैभव उबडे, शिवा पलीकोंडावार, बंटी सोळंके, चिंट भातनासे, अजय तक्कलवार, क्रिष्णा मेडलवार, शिवा पुरी, साई करकंठीवार यांच्यासह अनेक युवकांनी अहोरात्र परिश्रम घेऊन श्री रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम यशस्वी केले. तर यांना माजी बांधकाम सभापती व्यंकट भंडारवार, व्यंकट सातुरवार गुरु स्वामी यांच्यासह श्रीराम मंदिर समितीच्या विश्वस्थांनी अमुल्य मार्गदर्शन केले.
संध्याकाळच्या सत्रामध्ये श्रीराम मंदिर ते संपुर्ण किनवट शहर असे भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये श्री हनुमान दिक्षा धारण केलेल्या स्वामींनी व श्रीराम नवमी उत्सव समितीच्या सदस्यांनी अशा दोन शोभा यात्राकाढल्या ज्या मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाल्या यावेळी शोभा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्यानंतर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी राम नवमी उत्सव यशस्वी केल्या बद्दल श्री राम नवमी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांचा शाळ श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी बांधकाम सभापती व्यंकट भंडारवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्मानिवार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, अजय चाडावार, अभय महाजन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे बालाजी बामणे, मनोज जाधव, अमोल जाधव तर परशुराम जोशी, राजु बेजंकिवार, गौरव इटकेपेल्लीवार, राजकिरण नेम्मानिवार, सागर नेम्मानिवार यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते व राम भक्त उपस्थित होते. कार्यक्रामाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये प्रभु श्रीरामाच्या आरती ने करण्यात आला.

129 Views
बातमी शेअर करा