KINWATTODAYSNEWS

किनवट विविध सेवा सहकारी सोसायटी वर कृष्णकुमार व्यंकटराव नेमानीवार यांची बिनविरोध निवड.

किनवट तालुका प्रतिनिधी : ग्रामीण भागासह शहराचा सर्वांगिन विकास हा सहकार संस्थेच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे सहकार क्षेत्राला राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अशा या किनवट विविध सेवा सहकारी संस्थेवर किनवट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व्यंकटराव नेमानी वार यांनी आपला सहकार क्षेत्रावर असलेला वरचष्मा कृष्णकुमार नेमानी वार यांच्या चेअरमन पदाच्या निवडीने सिद्ध करून दाखविला. एवढेच नव्हे तर सर्वच्या सर्व संचालक हे काँग्रेस पक्षाचे निवडून आणून आपली एक हाती सत्ता काबीज केली. या निवडीने सहकार क्षेत्रातील संभाव्य होणाऱ्या निवडणुका कॉंग्रेसच्याच ताब्यात राहतील अशी ही शहरात उत्साहाने चर्चिले जात आहे. या निवडीबद्दल जिल्ह्याचे आमचे नेते प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर माजी जिल्हाध्यक्ष नामदेवरावजी केशवे, संचालक पणन महासंघ मुंबई, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, नारायणराव सिरमनवार, प्रमिल नाईक, यादव जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत रेड्डी. दिलीप पाटील, चव्हाण ईश्वर, नवीन राठोड, वसंत राठोड, अभय महाजन, नारायणराव सिडाम, सुभाष बाबू नायक, लक्ष्मीपती दोनपेल्लेवार, शेख सय्यद अनवार, फारुख चव्हाण, माधव खेडकर, कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रीती मुनेश्वर, काँग्रेसचे शहराध्यक्ष शहानवाज शेख, शेख परवीन, वंदना गाडेकर, निर्मलाताई कुमरे, जयश्री भरणे सह अन्य मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

72 Views
बातमी शेअर करा