किनवट प्रतिनिधी किनवट सारख्या ग्रामीण भागात बहुजन चळवळीच्या माध्यमातून निस्वार्थपणे जनसेवा करणारे आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते आदिवासीं रत्न नारायण सिडाम यांचा 71वा वाढदिवस आज गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक प्रा किशन मिरासे गोपीनाथ बुलबुले गोपाल कणाके यांनी केले आहे
आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते नारायण सिडाम हे मागील कित्येक वर्षापासून किनवट सारख्या आदिवासी दुर्गम मागास भागात निस्वार्थपणे जनसेवा करत आहेत बहुजन चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान असून शोषित पीडित समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी राज्यभरात अनेक मोठमोठी आंदोलने केली आहेत कायम जनसेवेचा वसा घेऊन लोकांच्या हितासाठी कार्यरत राहणाऱ्या या ज्येष्ठ नेत्यांचा आज गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात दुपारी 12.33 वा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री लोकनेते शिवाजीराव मोघे हे राहणार आहेत खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे आदिलाबादचे खासदार बापूराव सोयाम, माजी मंत्री वसंत पुरके,आमदार भीमराव केराम, आमदार अशोक उईके, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार प्रदीप नाईक,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, उपविभागीय अधिकारी किर्तिकुमार एच पूजार तहसीलदार मृणाल जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे व प्रशासनातील अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्रा किसन मिरासे, गोपीनाथ बुलबुले, गोपाल कणाके, निमंत्रक मारोती सुंकलवाड, व मुक्ती राम घुगे यांनी केले आहे