सचिन जाधव सारखनी दि .07/04/2022
एप्रिल महिन्यात पवित्र रमजान महिना सुरू झाला असून चिमुकल्या मरियमने रमजानचा पहिला उपवास ठेवला आहे.एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा चाळीस ते बेचाळीस अंशावर गेलेला आहे.अश्या परिस्थितीत मुस्लिम धर्मातील सर्वोच व पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात किनवट तालुक्यातील सारखणी येथील शेख मरियम हिने पालकांचा आग्रह धरून पहिला रमजानचा उपवास ठेवला आहे. मुस्लिम धर्मातील लहान मुले तरुण वडीलधारी मंडळीही उपवास ठेल्यानंतर नमाज पठण व कुराण वाचण्यामध्ये मग्न राहतात.कडक उन्हात उपवास ठेवणे म्हणजे अल्लाहच्या सावलीत असणारे लोक मुस्लिम समाजाच्या बारा महिन्या पैकी एक अफजल आणि उपवासाचा महिना म्हणजे रमजानचा महिना मानला जातो.या महिन्यात रमजान चे तीस दिवस उपवास ठेवला जातात.उपवास पाळणे म्हणजे पूर्णपणे उपवास असणे अगदी पाणी पिण्याचही सक्त मनाई असते. कडक उन्हात ही अल्लाहच्या उपवासात गुंतलेले असतात.तीस दिवसही तरावी ची नमाज अदा केली जाते.ही नमाज पूर्ण एक तासाची असते.