*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.7.जिल्यातील आज ठीक ठिकाणी २०१३ मध्ये आय एन एस विक्रांत ला वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू केली होती.त्यास केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थता दर्शवल्याने किरीट सोमय्या पुढे आले आणि राज्यातील जनतेकडून प्रचंड निधी गोळा केला.त्यासाठी रेल्वे स्थानकांवर, विमानतळावर डबे घेऊन उभे राहिले.आय एन एस विक्रांत हा देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्याच्या लोकांनी त्यांना मदत केली होती.आय एन एस विक्रांत च्या नावाखाली गोळा केलेल्या निधीच झालं काय? असा प्रश्न उपस्थित केला असता तो निधी राजभवनात सुद्धा जमा झाला नसल्याचे माहिती अधिकारा खाली कळाले.
लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्या यांनी गद्दारी केली आहे.त्यांचा विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा ह्यासाठी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयटीआय चौक येथे किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करत पुतळा दहन करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर,जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार,लोकसभा संघटक मनोज भंडारी,दयाल गिरी,गणेश मोरे,गंगाधर बडुरे, जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे,महानगरप्रमुख अशोक उमरेकर,शहरप्रमुख सचिन किसवे,तुलजेश यादव,गजानन राजरवार,माधव बिल्लेवाड, तालुकाप्रमुख जयवंत कदम, उद्धव पाटील शिंदे,अमोल पवार, सुरेश पाटील हिलाल,परमेश्वर जाधव,संजय पाटील कुरे, युवासेना सहसचिव माधव पावडे, प्रल्हादराव इंगोले,युवासेनेचे व्यंकटेश मामिलवाड, गजानन कदम,कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पावडे, बाबुराव वाघ, नवनाथ काकडे, बालाजी भायेगावकर,महिला आघाडीच्या निकिता शाहापुरवाड,दीपाली उदावंत, साहेबराव मामिलवाड,बळवंत तेलंग,दर्शनसिंघ सिध्दु,प्रकाश जोंधळे,श्याम पाटील वानखेडे, श्याम बन,प्रणव बोडके,दिगंबर कल्याणकर,आनंद जाधव, शैलेश राऊत,गौरव कोटगिरे, उमेश डिगे,पिंटू सुनपे,साई विभुते,धनंजय पावडे,नितिन सरोदे,गजानन हारकरे, नवजितसिंघ गाडीवाले,अशोक पावडे आदी उपस्थित होते.