KINWATTODAYSNEWS

शेतकरी विरोधी कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही- आमदार केराम

किसान ब्रिगेडचे मागणीला आमदार केरामांचा प्रतिसाद

माहूर तालुक्यातील पिक विमा प्रश्न लवकरच मार्गी लागणार… जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद

किनवट:-प्रतिनिधि
माहूर तालुका प्रशासन व पिक विमा कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पीक विमा पासून वंचित राहावे लागले. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून आमदार भीमराव केराम यांनी निष्काळजीपणे पिक पंचनामे करणारे अधिकारी आणि कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करावे अशी अपेक्षा प्रसिद्धी माध्यमांद्वारे व्यक्त केली होती.शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत आमदार केराम यांनी होय…शेतकरीविरोधी कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नसून प्रसंगी गुन्हा दाखल करण्याची कारवाई ही करण्यात येणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

माहूर तालुक्यातील २०२०-२१ खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे पैसे इफको-टोकियो कंपनीचे अधिकारी व महसूल,कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे माहूर तालुक्यात पिकविमा मिळाला नसल्यामुळे त्यांच्यावर आमदार भीमराव केराम यांनी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माहूर तालुका किसान ब्रिगेड तर्फे शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती.किनवट मतदार संघातील माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे पिकविमा कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल व कृषि विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्यांना पिकविमा मिळाला नाही.लगतच्या भोकर तालुक्यात सर्वच पिकांच्या पिक विम्याचे पैसे मिळाले आहेत.केवळ विमा कंपंनीच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी एकाच ठिकाणी बसून सदर पंचनामे केले असल्याने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर जाणीव पूर्वक अन्याय केला गेला आहे.माहूर तालुक्यातील गावागावात शेतकरी आमदार साहेब पीक विम्यावर कधी बोलणार अशी अपेक्षा लावून होते.तोच आमदार भीमराव केराम यांनी शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत माहूर तालुक्यातील नामंजूर पिक विम्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी यांना तातडीने पत्र पाठवून संवाद साधला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे सोबत झालेल्या चर्चेनंतर आमदार केराम यांनी उक्त प्रतिनिधीला बोलताना सांगितले की,माहूर तालुक्यातील पिक विमा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून या संबंधात जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून सकारात्मक चर्चा झाली आहे.शेतकरी प्रश्नासंदर्भात निष्काळजीपणा करणाऱ्या प्रशासनातील कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही.वेळप्रसंगी शेतकरी विरोधी त्यांच्या हित संबधात बाधा निर्माण करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा केराम यांनी दिला आहे.एकंदरीत आमदार भीमराव केराम यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे किसान ब्रिगेड शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहेत.शिवाय शेतकऱ्यांचा पिक विमा प्रश्न लवकर निकाली निघून माहूर तालुक्यातील पिक विमा पासून वंचित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

145 Views
बातमी शेअर करा