*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.5.प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार (Nanded Crime) करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.
दिवसाढवळ्या नांदेडमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं (Firing) कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्यावर गोळी झाडून कोणी हल्ला केला,हे अजूनही समजलेलं नाही.बियाणींच्या हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदाने खंडणीसाठी धमकी दिली होती, मात्र तेव्हा पुरवलेली सुरक्षा काही दिवसांपूर्वीच कमी करण्यात आली होती.
*काय आहे प्रकरण?*
नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर घरासमोर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. दोघा जणांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र संजय बियाणी यांनी उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.
संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा गोळीबार कुणी केला याचा शोध सुरु केला आहे.या घटनेमुळे नांदेड शहरात तणावाचे वातावरण पसरलं आहे.
तीन महिन्यांपूर्वीच सुरक्षा काढली
विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदा यांने खंडणीसाठी धमकी दिली होती,तेव्हापासून संजय बियाणी यांना सुरक्षा देण्यात आली होती.मात्र,तीन महिन्यांपूर्वीच संजय बियाणी यांच्यासह 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती.
नांदेडमध्ये घबराट
दरम्यान,गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे,का याचा शोध पोलीस घेत आहेत.नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा वापर वाढल्याचं चित्र आहे.
गोळीबाराच्या घटना सर्रास घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय बियाणी यांच्या हत्येच्या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.