किनवट (प्रतिनिधी) वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळ नांदेड यांच्या वतीने गंगाधर पाटील सोळुंके यांना शिवरत्न राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
डोंगरगाव तालुका किनवट येथील गंगाधर नारायणराव सोळुंके पाटील हे अनेक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळ नांदेड यांच्या वतीने शिवरत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गंगाधर पाटील सोळंके यांना नांदेड येथील कार्यक्रमात गौरविण्यात आले हा कार्यक्रम 31 मार्च रोजी संपन्न झाला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून समाज भूषण श्री एडवोकेट दिलीप ठाकूर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री बोकारे पाटील प्रमुख अतिथी भास्कर हंबर्डे ,टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री जाधव, महात्मा कबीर समता परिषदेचे एडवोकेट मुकुंदराज पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती वंदना ताई घुले अध्यक्षा , प्रगती भगत सचिव वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळ नांदेड यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री ढवळे सर यांनी केले.
वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळ नांदेड यांच्या वतीने गंगाधर पाटील सोळुंके यांना शिवरत्न राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
54 Views