KINWATTODAYSNEWS

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने तळणीच्या आरोग्य उपकेंद्रासाठी ८० लाखाचा निधी मंजूर !

हदगाव /नांदेड : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे मतदारसंघातील हदगाव तालुक्यातील तळणी येथील आरोग्य उपकेंद्राच्या नवीन दुमजली इमारत बांधकामास ८० लाख रुपयाच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच आरोग्य उपकेंद्राच्या दुमजली इमारत बांधकामास सुरवात होणार असून याकामी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य व अर्थ समिती सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांच्यासह आकाश रेड्डी यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला होता . या उपकेंद्रांमुळे आजूबाजूच्या परिसरातील ७ हजारच्या वर नागरिकांना याचा लाभ होणार आहे .
खासदार हेमंत पाटील यांनी गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून हिंगोली , नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य केंद्राची पाहणी केली होती. अनेक ठिकाणी त्यांना सुविधांचा आभाव आढळून आला होता . याबाबत ज्या ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र इमारत, कर्मचारी वसाहत , रुग्णवाहिका , कर्मचारी आभाव , इतर प्राथमिक आरोग्य सुविधांची कमतरता आहे त्याची माहिती घेतली होती व त्या पूर्ण करून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश दिले होते . त्यानुसार पहिल्या टप्यात किनवट तालुक्यातील जलधारा येथे इमारत बांधकाम करण्यास आणि माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथे कर्मचारी निवासस्थानाच्या इमारत बांधकामास ३ कोटी १५ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त होऊन त्याचे कामही सुरु झाले आहे .सोबतच हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात आली याचा आजवर अनेक रुग्णांना उपयोग झाला आहे. त्यानंतर आता हदगाव तालुक्यातील तळणी येथील आरोग्य उपकेंद्राच्या दुमजली इमारत बांधकामास ८० लक्ष रुपयाचा निधी मंजूर झालाअसून यासाठी लागणारी प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली आहे. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा आरोग्य व अर्थ समिती सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार या म्हणाल्या कि, ज्या ज्या ठिकाणी बांधकाम करण्यास निधी मिळाला आहे तो खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठपुराव्याने मंजूर झाला आहे . लवकरच या कामास सुरवात होणार असून . या उपकेंद्राच्या अंतर्गत असलेल्या तळणी , मनुला (खुर्द) , निवळा , उमरी, भाटेगाव , आमगव्हाण , उंचेगाव, शिऊर, इरापूर , साप्ती , वाकी परिसरातील ७ हजारच्या वर नागरिकांना आणि आजूबाजूच्या २० -२५ गावांना आता दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा मिळणार आहे.

40 Views
बातमी शेअर करा