*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.31.जिल्ह्यातील भोकर उपविभागीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक शेख नजीर यांना 11 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर पुन्हां एकदा खाकी वर्दीला लाचखोरीचा डाग लागला आहे. अश्या प्रकारामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचे मामा विरुध्द पोलीस स्टेशन उमरी येथे दाखल गुन्ह्यात मदत केली म्हणुन व गुन्ह्यातील जप्त असलेला ट्रक सोडण्यासाठी ११ हजार लाचेची मागणी उमरी येथील पोलीस उप निरिक्षक शेख नजीर यांनी केली होती.मात्र या कामासाठी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांचेकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दि 30 बुधवारी पडताळणी केली असता उमरी येथे सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एसिबीच्या जाळ्यात पोलीस उपनिरीक्षक शेख नजीर अडकला.त्यांनी 11 हजार रुपये लाचेची स्विकारलेली रक्कम सापडली आहे.
हि कार्यवाही डॉ.राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड,धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि,नांदेड परिक्षेत्र नांदेड, राजेंद्र पाटील,पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड यांचे मार्गदर्शन खाली सापळा अधिकारी अशोक इप्पर,पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि.नांदेड यांनी आपले सापळा पथकातिल पोना एकनाथ गंगातीर्थ,जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव,शेख मुजीब लाप्रवि नांदेड याना सोबत घेऊन कार्यवाही केली आहे