किनवट/प्रतिनिधी:गोकुंदा येथील विश्रामगृहात गोकुंदा येथील महिलांनी काँग्रेस पक्षात ऍड. तुकाराम रेंगे पाटील यांच्या हस्ते प्रवेश घेतला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे डिजिटल सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
ऍड. तुकाराम रेंगे पाटील माजी खासदार परभणी, प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल सभासद नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी किनवट विधानसभा मतदार संघात व हदगाव विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी मतदारसंघातील तालुका अध्यक्ष/ शहराध्यक्ष/ मुख्य नोंदणी कार्यकर्ते/ बूथ नोंदणी कार्यकर्ते/ लोकप्रतिनिधी /पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्व प्रकारच्या फ्रंट पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघातील कार्यक्रम राबविण्यासाठी वेळेवर उपस्थित राहून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी असे माजी खा. तुकाराम रेंगे पाटील यांनी केले आहे.
या प्रसंगी काँग्रेस नेते यादवराव जाधव, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानिवर, गिरीश नेमानिवर, नगरसेवक अभय महाजन,नगरसेवक इम्रान खान,जवाद आलम, स.अनवर स.फखरोधीन,शेख शहेनाज,शेख परवीन,लक्ष्मीपती दोनपेलवार,आनंद भालेराव, बाबू नाईक,व इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
२८ मार्च २०२२
किनवट टूडे चे संपादक आनंद भालेराव यांनी भारतीय काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केल्याबद्ल पुष्पगुच्छा देवून स्वागत करताना अल्पंसख्यांक शहरध्यक्ष स.अनवर स.फखरोधीन,काँग्रेसचे शेख.खालीद भाई व लक्ष्मीपती दोनपेल्लीवार..
गोकुंदा येथील महिलांनी काँग्रेस पक्षात ऍड. तुकाराम रेंगे पाटील यांच्या हस्ते घेतला प्रवेश
209 Views