किनवट/प्रतिनिधी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे डिजिटल सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
ऍड. तुकाराम रेंगे पाटील माजी खासदार परभणी, प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल सभासद नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी किनवट विधानसभा मतदार संघात व हदगाव विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर येत आहेत.
याप्रसंगी मतदारसंघातील तालुका अध्यक्ष/ शहराध्यक्ष/ मुख्य नोंदणी कार्यकर्ते/ बूथ नोंदणी कार्यकर्ते/ लोकप्रतिनिधी /पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्व प्रकारच्या फ्रंट पदाधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन आपापल्या मतदारसंघातील कार्यक्रम राबविण्यासाठी वेळेवर उपस्थित राहून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी असे माजी खा. तुकाराम रेंगे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
560 Views