KINWATTODAYSNEWS

किनवट / माहूर विधानसभा क्षेत्रासाठी शिवसंपर्क अभियानाअंतर्गत 23 मार्च रोजी पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह शिवप्रेमी शिवसैनिकांची बैठक संपन्न

किनवट (सा.वा.) किनवट / माहूर विधानसभा क्षेत्रासाठी शिवसंपर्क अभियानाअंतर्गत 23 मार्च रोजी पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह शिवप्रेमी शिवसैनिकांची बैठक तसेच तसे महामेळाव्याचे आयोजन शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोपीकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे शिवसंपर्क अभियान घेण्यात येणार आहे .या मेळाव्यास किनवट /माहूर मतदारसंघातील तमाम शिवप्रेमी आणि पक्षातील सर्व आजी -माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे सह तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक यांनी केले आहेत . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून सचिव अनिल देसाई , संपर्कप्रमुख आनंद जाधव, हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील , जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या 23 मार्चला ठीक अकरा वाजतामेळावा घेण्यात येणार असून मतदार संघातील आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूका आणि इतर बाबतीत मार्गदर्शन केली जाणार असून पक्षातील विधानसभा संघटक , उपतालुकाप्रमुख , शाखाप्रमुख, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, सर्कलप्रमुख , तालुका सन्मवयक , शहर संघटक, यांच्यासह पक्षातील सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे यांनी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना केले आहेत .

430 Views
बातमी शेअर करा