*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.16.मुखेड तालुक्या मधील मौजे दापका राजा ता. मुखेड जि.नांदेड येथील अल्पभूधारक शेतकरी रामकिशन भिमराव गायकवाड वय 52 वर्षे यांनी आपल्या रहात्या घरीच गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवली.
सविस्तर व्रत असे की रामकिशन भिमराव गायकवाड हे मौजे दापका राजा येथील रहिवासी होते. त्यांना त्यांच्याच मुळ गावी दिड एकर शेती आहे. घरची गरीबी परिस्थिती असल्याने त्यांना जास्त शिक्षण घेता आले नाही. ते जेमतेम आठवी नववी शिकलेले होते.
ई.स.2010 साली त्यांच्या मामाची मुलगी अर्चना हिच्याशी विवाह झाला होता.लग्नानंतर अगदी दोन वर्षांनी तिरुपती नावाचा पुत्र तर पुन्हा दोन वर्षांनी राजेश असे दोन अपत्ये त्यांना झाले. पती व पत्नी दोघेही आपल्या संसारात आनंदी होते. आपल्या मुलांच्या भविष्या साठी मिळेल ते मोलमजुरी करीत होते.त्यांचा संसार सुखात चालला होता परंतु 2018 सालापासून त्यांच्या संसाराला काळाची नजर लागली आणि संसाराला अधोगती चालू झाली. शेतीमध्ये पेरलेले ही त्यावर्षी काही पिकले नाही. उलट कर्जबाजारी व्हावे लागले.
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा जांब बु.येथून सन 2018 या वर्षी 60000 साठ हजार रुपये शेती वर कर्ज उचलले होते तसेच भारत फायनान्स चे पण कर्ज उचलले होते.
गरीब परिस्थिती व नापिकीमुळे उचललेल्या कर्जाची परतफेड करणे कठीण झाले व व्याजासह कर्ज रक्कम वाढत गेली या मानसिक तणावाखाली ते होते या तणावामुळे त्यांना पॅरेलेसीस अर्धांगवायू चा आजार निर्माण झाला ह्या सर्व अडचणींवर मात करणे पत्नी,मुलांचा सांभाळ करणे शेतातील नापिकीमुळे अल्पभूधारक रामकिशन (रामकृष्ण) भिमराव गायकवाड यांना जगणे कठीण झाले
कोरोणा मुळे हाताला कामे मिळाली नाहीत.डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच होता. विचारांचे चक्र त्यांच्या डोक्यात सारखे फिरत होते.पत्नी व मुलांकडे पाहुन मनातल्या मनात अर्धे मेले होत होते परंतु त्यांच्या मनातील भावना,त्यांच्या व्यथा, दुःख त्यांनी कोणालाही सांगितले नाही.शेवटी दि.15 मार्च 2022 रोजी घरी कुणीही नसल्याचे पाहून सकाळी 11:30 वाजता रहात्या घरीच गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना रामकिशन गायकवाड व दोन मुले तिरुपती रामकिशन गायकवाड वय 9 वर्षे आणि राजेश रामकिशन गायकवाड वय 6 वर्षे असा परिवार आहे.त्यांच्या जाण्यामुळे (निधनामुळे) नातेवाईक,सर्व गावकरी व परिसरात हळहळ व्यक्त करीत आहेत.