*विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*परभणी*:यापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे संपूर्ण राज्यासाठी १००००(दहा हजार) लाभार्थ्यांसाठी टार्गेट होते. आता त्यात ८०००(आठ हजार) ने कपात झाली आहे. म्हणजे आता केवळ दोन हजार लाभार्थ्यांचे भवितव्य बँकेवर अवलंबून असणार आहे.
एक तर महामंडळाकडे निधीची कमतरता आणि चारदोन वर्षात तुटपुंजा निधी आलाच तर बँक अधिकारी गरीब लाभार्थ्यांना दलालांमार्फत येणाऱ्या कर्ज प्रस्तावांना मंजुरी देऊन खऱ्या गरजू मातंगावर अन्याय करतात. मातंगाच्या नावावर येणाऱ्या पैशाची वाटमारी रोखण्यासाठी लाल सेनेच्या वतीने 14 मार्च पासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. खडकाला धडका घेणारी आंदोलनं तर सुरूच आहेत. परंतु मातंगाला तुटपुंजा का होईना महामंडळ आधार ठरणार आहे.
उद्ध्वस्त झालेल्या महामंडळाला नव्यानं उभं करण्यासाठी आणि निरंकुश बँकांना अंकुश लावण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.हे आंदोलन वरकरणी बडोदा बँकेच्या शाखा अधिकाऱ्याच्या विरोधात दिसत असले तरी महाराष्ट्रातील तमाम बँका सर्व मातंगांना अशीच वागणूक देतात हे सत्य आहे.
जिल्ह्याजिल्ह्यातील गरीब मातंगाची वेदना दत्तक घेऊन लाल सैनिक मैदानात उतरले आहेत.आंदोलनात सहभागी होण्याचे अवाहन गणपत भिसे, उत्तम गोरे,अशोक उबाळे,अशोक जाधव,कोंडीबा जाधव, विकी गोरे,अविनाश मोरे,किशोर कांबळे,शेषाद्री मोरे,पांडुरंग दादा पवार आदींनी केले आहे.