KINWATTODAYSNEWS

केंद्र शासनाच्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) नांदेड ची बैठक दिनांक १२ मार्च २०२२ रोजी नियोजन भवन नांदेड येथे संपन्न

किनवट ता. प्र दि १६ केंद्र शासनाच्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) नांदेड ची बैठक दिनांक १२ मार्च २०२२ रोजी नियोजन भवन नांदेड येथे संपन्न झाली सदर बैठकीत नांदेड जिल्ह्याच्या समितीचे दिशा समितीचे अध्यक्ष खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ज्यामध्ये सदस्य सचिव म्हणुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी जबाबदारी पार पाडली तर नांदेड जिल्ह्याच्या दिशा समितीवर शासन नियुक्त अशासकीय सदस्य असलेले ज्येष्ठ शिवसैनिक मारोती सुंकलवाड यांनी किनवट तालुक्यातील आरोग्य विषयक समस्या मांडल्या असुन काही मागण्याचे निवेदन बैठकीत दिल्याने किनवट व गोकुंदा येथिल आरोग्य विषयक सुविधा सुधारण्याच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहे.
नांदेड जिल्ह्याच्या दिशा समितीचे अध्यक्ष खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना सादर केलेल्या निवेदनात दिशा समितीचे सदस्य मारोती सुंकलवाड यांनी सादर केलेल्या निवेदन मागणी केली आहे कि, गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांना मंजुरी द्यावी, किनवट शहरातील जुण्या नागरी दवाखाण्याची जिर्ण इमारत निष्काशीत झाली असुन त्या ठीकाणी नविन इमारत बांधण्यात यावी आणी तशा पध्दतीचा प्रस्ताव आदिवासी उपयोजने अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान तर्फे शासनस्तरावर तत्काळ पाठवण्यात आला आहे असे समजते, गोकुंदा शहराकरिता आवश्यक असलेली पाणी पुरवठा योजना जी १९ कोटी रुपये किमतीची मंजुर झाली होती जी येथिल स्थानिक राजकारणामुळे रद्द झाली ती पुन्हा पुणर्जिव करावी, गोकुंदा येथे ३३ के.व्ही केंद्रा मध्ये १० एम.व्हि.ए क्षमतेचे २ ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावे, किनवट शहरात असलेले जिल्हा परिषदेचे विश्रामगृह व जुणी इमारत तत्काळ निष्काशीत करुन त्या ठीकाणी सुसज्ज इमारत बांधण्यात यावी, किनवट येथे बांधकाम करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे गाळे तत्काळ वाटप करण्यात यावे, कोठारी येथिल पुलाचे बांधकाम तत्काळ सुरु करावे, गोकुंदा ग्राम पंचायत अंतर्गत वस्तीवाढ ठिकाणी विद्युत पोल मंजुर करावे, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे स्त्रीरोग तज्ञ व भुल तज्ञ यांची नियुक्ती करावी, किनवट जि.प शाळे करिता ४ खोलीचे बांधकाम मंजुर करावे. या व अशा अनेक मागण्या मारोती सुंकलवाड यांनी दिशा समितीच्या बैठकीत मांडल्या तर निवेदनात नमुद हि केले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनान्वये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भोसीकर यांनी त्यांच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असुन त्यानुसार त्यांनी मा. उपसंचालक आरोग्य सेवा लातुर कडे मारोती सुंकलवाड यांच्या मागण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात किनवट व गोकुंदा येथिल आरोग्य विषय सुविधा सुधारण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे गोकुंदा उपजिल्हा रुगणालय गोकुंद येथे १०० खाटांचे श्रेणीवर्धन कामास गती प्राप्त झाली आहे.
हिंगोली लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या शिफारीनुसार माझी निवड नांदेड जिल्ह्याच्या “दिशा समितीवर” झालेली आहे, त्या निवडीला सार्थ ठरवण्याच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या दिशा समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना किनवट तालुक्यातील विविध विकास काम संदर्भात निवेदन सादर केले

1,068 Views
बातमी शेअर करा