किनवट ता. प्र दि १४ शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जुन्या नगर परिषदेच्या जागेवर व्हावा व भव्य स्वरुपात व्हावा या करिता पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने साई कल्याण मंडपम येथे सर्व पक्षिय, सर्व धर्मियांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शहरातील ज्येष्ठ व मान्यवर मंडळीनी उपस्थिती दर्शवली होती. तर बैठकीत सर्वानुमते योगतज्ञ अखिल खान यांना पुढील आंदोलनाकरिता संघर्ष समितीचे अध्यक्ष पद सोपवण्यात आले तर यापुढील आंदोलन हे अखिल खान यांच्या नेतृत्वाखाली होईल, झालेल्या बैठकी नंतर उपस्थित सर्व किनवट नगर परिषदेत आले त्यावेळी त्यांनी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्याशी चर्चा केली.
चर्चे दरम्यान नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकुण घेतले व मला शहरातील ज्येष्ठ नागरीक व आजी, माजी आमदारां समोर आपले म्हणणे मांडावे लागेल त्यानंतरच काही सांगता येईल असे सांगितले तर या प्रकरणी सर्वांचे म्हणणे ऐकुणच अंतिम निर्णय घेतला जाईल असे हि त्यांनी सांगितले.
तर शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असलेले योग तज्ञ अखिल खान यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या काय आहे या विषय मागण्या नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्यासमोर मांडल्या तर बाजार समितीचे सभापती अनिल पाटील, माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, ज्येष्ट नेते सुधाकर भोयर, गिरिष नेम्मानिवार, किशन कल्लाळे, मारोती सुंकलवाड यांनी आपले म्हणणे मांडले.
तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा भव्य दिव्य व्हावा या करिता आयोजित बैठकीस सुधाकर भोयर, अनिल पाटील, फुलाजी गरड, सुनील पाटील, बालाजी मुरकुटे, व्यंकट भांडरवार, शिवा पवार, गिरीष नेम्मानिवार, अखिल खान, प्रवीण म्याकळवार, राजू पाटील, सूरज सातुरवार, राम कोरडे पाटील, मारोती दिवासे, जहिरोड्डीन खान, काकडे, पत्रकार किरण ठाकरे, मारोती सुंकलवाड, शेख चाँद, शेख सलीम मदार, कचरू जोशी, बालाजी बामणे, सुशील कदम, संतोष चनमनवार, संतोष यलचलवार, ताटे पाटील, अनिल येरावार, शिवकुमार बोकडे, अकबर खान, सचिन कदम, राशलवार, किशन कल्ल्हाले पाटील, अमरदीप कदम, राजू सुरोशे, पत्रकार बालाजी शिरसाठ, यांच्यासह अनेक शिव प्रेमिं व नागरीकांची उपस्थिती होती