KINWATTODAYSNEWS

रंगकर्मी प्रतिष्ठान आयोजित खुल्या भव्य बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

किनवट (प्रतिनिधी)
रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूर महाराष्ट्र आयोजित नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पहिल्यांदाच शासकीय कर्मचारी,व्यापारी व शालेय विद्यार्थ्यांसाठी शनिवार रविवार दि.12 मार्च व 13 मार्च रोजी तालुका क्रीडा संकुल,किनवट जि.नांदेड येथे भव्य खुल्या डे-नाईट बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पअधिकारी किनवट कीर्तिकिरण पूजार तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी,किनवट(डीवायएसपी) विजय डोंगरे ,पं.स किनवट गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर,हदगाव,हिमायतनगर,किनवट, माहूर यवतमाळ,उमरखेड पुसद, पूर्णा तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते.बॅडमिंटनच्या दुहेरी सामन्यांमध्ये नांदेडचे चेतन माने,व अभिषेक डोंणगे यांनी प्रथम क्रमांक,तर नांदेडचेच प्रसाद देवर्षी व किरण माने यांनी द्वितीय क्रमांक तर किनवटचे प्रशांत कोरडवार,किसन राकोंडे यांनी तृतीय क्रमांक पटकवला.त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज- चेतन माने(नांदेड), मॅन ऑफ द मॅच- अभिषेक डोंणगे(नांदेड), बेस्ट शूटर प्रशांत कोरडवार(किनवट), बेस्ट डिफेन्स-शिवनंदनी उप्पलवार(किनवट)यांनी बक्षिसे पटकावली.

सदर बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी नगरपरिषद किनवट उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने,नगरपरिषद किनवट माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अभय महाजन,युवा उद्योजक संजय नेम्मानिवार,लसाकम तालुका अध्यक्ष संजय तलवारे,शिक्षक नेते नरसिंग एंड्रलवार,जुनी पेन्शन अध्यक्ष गोपाळ कनाके, केंद्रप्रमुख संजय कांबळे मुख्याध्यापक चांदोबा गायकवाड, गुरुमाऊली स्पोर्ट्स किनवट प्रो.प्रा.ज्ञानेश्वर पानधोंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.बिभीषण मद्देवाड (अध्यक्ष) रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरसेवक अभय महाजन, प्रसिद्ध उद्योजक संजय नेम्मानीवार,प्रशांत कोरडवार, रामदेव शर्मा,शिवाजी जाधव,विश्वास कोल्हारीकर,राजेंद्र उप्पलवार,प्रवीण गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय खेळाडू तथा क्रीडाशिक्षक प्रेमसागर तांदळे यांनी जबाबदारी पार पडली.सदर स्पर्धेसाठी कृष्णकांत सुंकुलवाड,रामराव जाधव,नारायण चंदनकर,अतिश तामगाडगे,शिवा सिद्धेश्वरे, प्रशांत शेरे,प्रवीण पिल्लेवार, रवी भालेराव,अनिल राठोड यांनी स्पर्धेला उपस्थित राहून सहकार्य केले.स्पर्धेचे मुख्य आयोजक मारोती भोसले उपाध्यक्ष ,सुनील लासुरे सहसचिव रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जिल्हा लातूर यांनी बॅडमिंटन अशा नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण खेळाला प्रोत्साहन देऊन किनवट तालुक्यात पहिल्यांदाच अशा स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

597 Views
बातमी शेअर करा