KINWATTODAYSNEWS

मौजे वडोली येथिल आदिवासी ग्रामस्थांना मागील २ वर्षापासुन घरकुल योजनेचा लाभ मिळेना;जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

किनवट ता.प्र दि २४ तालुक्यातील मौजे वडोली येथिल आदिवासी ग्रामस्थांनी मागील २ वर्षापासुन घरकुल योजनेचा लाभ मिळावा याकरिता अर्ज केला परंतु ते आदिवासी समाजाचे असल्याने त्यांना ग्रामपंचायत ऑपरेटर, ग्रामसेवक, तसेच गटविकास अधिकारी यांनी संगणमताने व जाणिवपुर्वक या योजने पासुन वंचित ठेवल्याचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना गावक-यांच्या स्वाक्षरीनिशी सादर केल्याने मौजे वडीली गावातील दोन्ही राजकिय गटात हडकंप माजला आहे.

       मौजे वडोली येथिल आदिवासी समाजाच्या ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनात थेट आरोप केले आहे तर ऑपरेटर अजिम यांच्याकडे प्रतिअर्ज १०० रुपये या दराने घरकुल योजने करिता आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन करण्याकरिता चा खर्च देऊन हि दोन वर्षात कोणत्याही प्रकारची माहिती यासंबधी अर्जदारांना प्राप्त न झाल्याने आदिवासी गावक-यांमध्ये प्रचंड रोष आहे. तर ग्रामपंचायत ऑपरेटर, ग्रामसेवक, तसेच गटविकास अधिकारी यांनी जातीयव्देषामुळे आम्हाला योजनेपासुन वंचित ठेवल्याचे हि ग्रामस्थांना निवेदनात नमुद केले आहे.

अर्जदार हे आदिवासी समुदायातील असुन त्यांनी घर कच्ची आहेत यामुळे त्यांना उन, पाऊस, हिवाळा, वादळवारा यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो अशा स्थितीत यांच्याकडे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायतसमिती सदस्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी थेट टोकाची भुमिका घेत जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन केले आहे. व दोषींविरुध्द कठोर कारवाईची मागणी केली आहे.

       मौजे वडोली येथिल आदिवासी ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनावर नामदेव शेडमाके, नारायण नागो कुडमेते, परसराम संभाजी मडावी, माणिक मडावी, बालाजी आत्राम, भिमराव शेडमाके अलोक कुमरे, रामचंद्र कुसराम, ज्योतीराम शेडमाके यांच्यासह ३१ ग्रामस्थांच्या स्वाक्ष-यां आहेत.

155 Views
बातमी शेअर करा