KINWATTODAYSNEWS

मानवहीत लोकशाही पक्ष व लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे वतीने १ लाख ५० हजाराची मदत! -वसंतराव जोगदंड.

वाशिम: रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील कैलास गायकवाड ह्यांचा कर्ता मुलगा स्व.अमोल गायकवाड यांचे २ मार्च रोजी आकस्मिक निधन झाल्यामुळे घरातील कर्ता पुरुष जान्याणे कुटुंब उघड्यावर पडले.दि.५ मार्च रोजी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विदर्भ अध्यक्ष मानवहीत लोकशाही पक्ष कर्मचारी आघाडीचे श्री वसंतराव जोगदंड सर व भारतभाऊ अंभोरे विदर्भ संघटक मानवहीत लोकशाही पक्ष ह्यांनी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव अवचार व मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आण्णा भाऊ साठे यांचे नातु सचीन भाऊ साठे याची प्रेरणा घेऊन बोरखेडी येथे जाऊन गायकवाड कुटुंबाची भेट घेतली व कुटुंबाचे सांत्वन केले व समाज बांधवांचे उपस्थितीत स्व.अमोल ह्यांचे जान्याणे त्याचा दिड वर्षांचा मुलगा व २० वर्षीय पत्नी व वृध्द आई वडील ह्यांना लवकरच अर्थीक मदत केली जाईल असे जाहीर केले होते.त्या अनुषंगाने श्री वसंतराव जोगदंड ह्यांनी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मानवहीत लोकशाही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी अनुसुचित जाती आरक्षण वर्गीकरण समीती चे वतीने महाराष्ट्रातील समाजबांधवांना मदतीचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने मदतीचे आवाहनाला प्रतिसाद देत मदत जमा झाली असल्याचे वसंतराव जोगदंड सर ह्यांनी आमचे प्रतीनीधीला सांगीतले.त्या अनुषंगाने आज दि.९ मार्च रोजी सकाळी ठीक ११ वाजता स्व.अमोल गायकवाड ह्याचे दिड वर्षांचा मुलगा ह्याचे भविष्यासाठी समाजबांधवांच्या वतीने जमा केलेला सामाजिक उत्तरदायित्व निधी १ लाख ५० हजार रुपये निधी नगदी रोख कुटुंबाचे हाती मदत म्हणून आई वडिल, पत्नी ह्यांचे कडे सुपुर्त केले.तसेच शासनाच्या विविध योजना देखील मिळवुन देण्यासाठी मदत केली जाईल असे जाहीर केले.सदर प्रसंगी गजाननराव खंदारे विदर्भ मार्गदर्शक मानवहीत लोकशाही पक्ष, भारत अंभोरे विदर्भ संघटक मानवहीत लोकशाही पक्ष, सुखदेव कांबळे सर, प्रभाकर जाधव अध्यक्ष मालेगाव तालुका, गावातील तंटामुक्ती अध्यक्ष श्री विश्वनाथ वायभासे महाराज रतन गायकवाड, लक्ष्मण गायकवाड,छब्बू अभोरे, रंगनाथ चव्हाण,संजय गायकवाड,वामन इंगळे, विष्णू गायकवाड, रामेश्वर गायकवाड,शिवम गायकवाड, विकास इंगळे,सौ.कमलाबाई इंगळे,रानुबाई गायकवाड,संगिताताई रणखांब,आदी गावकरी व समाज बांधव उपस्थित होते यापुढे महाराष्ट्रातील उघड्यावर पडणार्या समाज बांधवांचे कुटुंबाला मदत समाज बांधवांचे सहकार्याने करणार असल्याचे श्री वसंतराव जोगदंड सर हराळ उपाध्यक्ष लसाकम तथा विदर्भ अध्यक्ष मानवहीत लोकशाही कर्मचारी आघाडी, अनुसुचित जाती आरक्षण वर्गीकरण समीती अध्यक्ष वाशिम जिल्हा ह्यांनी आमचे प्रतीनीधीला सांगीतले.

494 Views
बातमी शेअर करा