KINWATTODAYSNEWS

तालुका विधीसेवा समिती व वकील संघाच्या वतीने शनिवारी किनवट न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेले प्रकरणे निकाली

किनवट(,ता.१२) : तालुका विधीसेवा समिती व वकील संघाच्या वतीने शनिवारी किनवट न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेले 10 दिवाणी ,23 फौजदारी खटले व विविध बँकेचे 64 दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण 97 प्रकरणामध्ये एकूण 29 लाख 52 हजार 850 इतकी तडजोडीची रक्कम प्राप्त झाली. ही प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. बँकेच्या दाखलपूर्व ६४ प्रकरणामध्ये एकूण 21लाख 63 हजार ७३२ रुपयांच्या रकमेवर तडजोड झाली. दिवाणी व फौजदारी प्रकरणी 7 लाख 89 हजार 118 रूपयांची तडजोड झाली. लोकअदालतीत अनेक प्रकरणे निकाली निघाल्याने न्यायालयावरील कामाचा ताणही कमी झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
यासाठी दोन पॅनल करण्यात येऊन एका पॅनलचे प्रमुख म्हणून तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधिश एस.बी. अंभोरे, तर पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड.आर.डी.सोनकांबळे व के. मूर्ती यांनी काम पाहिले. दुसर्‍या पॅनलवर प्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधिश व्ही.जी. परवरे आणि सदस्य म्हणून अ‍ॅड.टी.एच.कुरेशी व प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे यांनी काम पाहिले.
यावेळी सरकारी वकील अशोक पोटे,सहाय्यक सरकारी वकील वसंत चव्हाण, अ‍ॅड .ए.जी.चव्हाण, अ‍ॅड.पंकज गावंडे,अ‍ॅड.श्रीकृष्ण राठोड, अ‍ॅड.पी. एम.गावंडे,अ‍ॅड.निलेश राठोड,अ‍ॅड.नयन मुनेश्वर,अ‍ॅड.सुनिल येरेकार,अ‍ॅड.मिलिंद सर्पे,अ‍ॅड.सुरेश मुसळे,अ‍ॅड.सुनिल सिरपुरे,अ‍ॅड.किशोर मुनेश्वर,अ‍ॅड.एस.डी.राठोड,अ‍ड.दिलप काळे,अ‍ॅड.दिलिप कोट्टावार,अ‍ॅड.विजय चाडावार,अ‍ॅड.टी.आर.चव्हाण,अ‍ॅड.के.एस.काजी,अ‍ॅड.ए.एम.कोमरवार,अ‍ॅड. डी.एम.दराडे,संतोष जक्कुलवार,विठ्ठल आरपेल्लीवार,वसंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती,तर भूषण वेताळ ,अनुराग भस्मे, नितीन वानखेडे, अल्तमश शेख, विनोद झोडे, किशोर गावंडे, शैलेश आढाव, अमोल शिंदे यांच्यासह विविध बँकेच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वितेसाठी एस.एम.चिटमलवार, एल.वाय. मिसलवार,ए.एस.धोटे,पी.आर.बहादरे,बी.ए.घुले,आर.एस.माने,एन.एस.बारसे,शेक शौकत,व्ही.पी.कान्हेकर यांंच्यासह पोलिस कर्मचारी उकंंडराव राठोड,रुपसिंग जाधव,दिगांबर पवार व सुभाष दोनकलवार यांनी यशस्वीतेकरिता
परीश्रम घेतले.

392 Views
बातमी शेअर करा