KINWATTODAYSNEWS

उत्तर प्रदेश तसेच चार राज्यात भरघोस मतांनी भाजपाला कौल दिल्याने किनवट येथे उल्हास व जल्लोष

किनवट/प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस एड. प्रतीक केराम यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश तसेच चार राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भरघोस मतांनी भाजपा पक्षाला कौल दिल्याने किनवट येथे सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उल्हास व जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, माँ.जिजाऊ चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सर्व पुतळ्याला अभिवादन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला

यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिनकर काका चाडावार, भाजपा ओबीसी आघाडी ज्येष्ठ नेते बाबुराव केंद्रे, तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमाकांत कराळे, जिल्हा परिषद सदस्य भगवान हुरदुके, कुलदीप घोडेकर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, आनंद मच्छेवार नगराध्यक्ष, सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उप सभापती कपिल करेवाड, माजी नगर उपाध्यक्ष अजय चाडावार, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण सुकरवार, विवेक केंद्रे, उद्धव मुंडे,आमदार जनसंपर्क अधिकारी संतोष मरस्कोल्हे,नगरसेवक बालाजी धोत्रे, शिवा आंधळे, प्रदीप एडके, स्वागत आयनेनिवार, बबलू जाधव, सुभाष कोहाड, शिवा क्यातमवार, फझल चव्हाण, संदीप बोडके, बाबू तक्कलवार, मारोती मोहिते, आलोद्दीन शेख, प्रशांत दहिफळे, यांच्या सह मोठया सख्यात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

492 Views
बातमी शेअर करा