नांदेड / : गोदावरी फाउंडेशन व गोदावरी अर्बनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे पहिल्यांदाच गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी महिलांनी रक्तदान करून उस्फुर्त प्रतिसाद दिला.या शिबिराला गोदावरी फाऊंडेशन ढाणकी शाखेच्या मुख्य समन्वयक आशा कलाने , उपसमन्वयक सारिका येरावार , सहउपसमन्वयक शिवाणी कोडगिरवार यांच्यासह आदी उपस्थित होते. गोदावरी फाऊंडेशनच्या ढाणकी शाखेच्या नवनिर्वाचित कार्यकारणी मंडळाचे आणि सभासदांचे गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री पाटील व सचिव धनंजय तांबेकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ढाणकी येथे आयोजित महिलांचे रक्तदान या आगळ्यावेगळ्या सामाजिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा होती .ढाणकी शहरातील महिला आपल्या रोजच्या जीवनातून थोडा वेळ काढून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या . गोदावरी अर्बन सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून कार्य करत असते . त्याकरिता गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात येतात महिलांचे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी कार्यशाळा, महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा , महिलांना रजई प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणे , नेत्ररोग तपासणी व मोफत चष्म्याचे वाटप , कोरोना काळात जनजागृती करून मोफत अन्नधान्य किटचे वाटप . सोबतच स्किल डेव्हलपमेंट च्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती महिलांना करून देणे आणि बचतगटांना लघुउद्योग सुरु करण्यासाठी मार्गदर्शन करणे या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातात. एकूणच महिला सक्षमीकरणासाठी गोदावरी फाउंडेशन सातत्याने पुढाकार घेत असते . त्याच अनुषंगाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ढाणकी येथे महिला रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते . याशिबिरास गोदावरी अर्बन ढाणकी शाखेचे शाखाधिकारी मुकुल पांडे,अधिकारी संतोष विरगुडे,श्रीनिवास पाध्ये, अभिजीत मिंडपिल्लेवार,मनीषा देशमुख,संकेत साखरे, दत्तात्रय महाजन ,ज्ञानेश्वर नाईकवाडे, संदेश गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
याकार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सुप्रिया चिन्नावार ,माधुरी येरावार, शितल वर्मा, अनिता जिल्हावार, जयश्री कोडगिरवार ,शितल सोनी, सुरेखा कुरटवाड, आरती विभुते, अनुराधा योगेवार, मीना दिल्लेवार , सोनम वाळके, वर्षा देवकर, प्रणिता चिन्नावार सरस्वती चिन्नावार , डॉ. प्रिती गंदेवार ,डॉ सपना राहुलवाड , सपना गीते ,विद्या राठोड, शारदा शिंदे ,बेबीताई देशमुख लता चव्हाण ,सरला वर्मा, रोहिणी केशेवाड ,शोभा राहुलवाड ,सुनिता भोसले, संध्या घुगरे, कांचन ठाकूर, यांच्यासह शिक्षण, आरोग्य राजकीय , पोलीस ,बँकिंग क्षेत्रातील नामवंत महिलांची उपस्थिती होती.या शिबिरास नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ब्लड बँकेचे सहकार्य लाभले .
गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने ढाणकी येथे प्रथमच महिलांसाठी रक्तदान शिबीर ; नाविन्यपूर्ण उपक्रमाची सर्वत्र चर्चा
278 Views