KINWATTODAYSNEWS

रात्रीच्या अभ्यास वर्गास उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांची भेट. शिवा कांबळे यांच्या धडपडीचे केले कौतुक..

*मालेगाव : अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल,मालेगाव तेथील उपक्रमशील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी सुरू केलेल्या इयत्ता दहावीच्या रात्रीच्या अभ्यास वर्गाला उपविभागीय अधिकारी तथा ८५ भोकर मतदार नोंदणी अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी भेट देऊन वर्गाची पहाणी केली.*
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय व्हावी आणि त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शिवा कांबळे हे गेल्या तीन वर्षांपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या रात्रीच्या अभ्यास वर्गाचे आयोजन करत असतात.गेली दोन वर्ष हा अभ्यास वर्ग एक फेब्रुवारी ते आठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान या अभ्यास वर्गाचे आयोजन केले होते.या वर्षी शिवा कांबळे यांनी दोन मार्च ते १४ मार्च दरम्यान हा अभ्यास वर्ग आपल्या प्रशालेत चालू केला असून
काल मंगळवार दिनांक ०८ मार्च रोजी रात्री दहा वाजता उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे,अर्धापूर तहसिलचे नायब तहसीलदार सुनील माचेवाड,गुरुदेव सेवा मंडळाचे प्रभाकर सोनारीकर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी माहिती दिली. तर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी “परीक्षेला जाताना” या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. शिवा कांबळे हे गेली तीन वर्षे सातत्याने हा नावीन्यपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम चालू केल्याबद्दल त्यांच्या धडपडीचे आणि कार्याचे त्यांनी कौतुक करुन त्यांचा सत्कार केला..व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.विशेष म्हणजे रात्री दहा वाजता उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी कुठलीच‌ कल्पना न देता.या अभ्यासवर्गास भेट देऊनशिवा कांबळे यांचे कौतुक केले….

552 Views
बातमी शेअर करा