KINWATTODAYSNEWS

ॲड.दिलीप ठाकूर यांच्या काया पालट उपक्रमाला अखंडित एक वर्ष पूर्ण

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.9.भाजपा महानगर नांदेड व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने
धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे राबवित असलेल्या कायापालट उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त भणंग अवस्थेत फिरणा-यांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे व प्रत्येकी शंभर रुपयाची बक्षिसी देण्यात आली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संदेशानुसार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली
समाजातील तळागाळातील लोकांना एकत्रित करून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येतो.परंतु सोमवार दिनांक सात मार्चला दिलीप ठाकूर हे बाहेरगावी असल्यामुळे बुधवारी सकाळी सहा वाजता कायापालट सुरू झाला.बाराव्या महिन्यात छत्तीस बेघरांना शहरातून फिरुन कार मध्ये बालाजी मंदिर परिसरात आणण्यात आले. त्यापैकी काहीजण अतिशय गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्यांना चालता सुद्धा येत नव्हते.

स्वंयसेवक बजरंग वाघमारे यांनी सर्वांची कटिंग दाढी केली.थंडी असल्यामुळे गरम पाण्याची व्यवस्था बालाजी मंदिरचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे करण्यात आली होती.

कित्येक महिने अंघोळ न केलेल्या या भ्रमिष्टांना साबण लावून स्नान घालण्यात आले.स्वच्छ होऊन नवीन कपडे घातल्यामुळे त्यांच्या दिसण्यात अमुलाग्र बदल झाला होता .सर्वांच्या चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर बालाजी मंदिरचा परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे सचिव अरुणकुमार काबरा,कोषाध्यक्ष सुरेश निल्लावार,ओमकार यादव, बालाजी जाधव, सविता काबरा यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाला अरुण महाजन व परमजितसिंघ भाटिया यांनी सदिच्छा भेट दिली.एखादा उपक्रम सुरु करणे सोपे असते परंतु सातत्याने तो चालू ठेवण्याचे अवघड काम संयोजक दिलीप ठाकूर हे करत असल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

634 Views
बातमी शेअर करा