*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.8.एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामद्धे नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांचे सुपुत्र अभिजीत चिखलीकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने सुपुत्राने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दमदार यश मिळवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
एमपीएससी अंतर्गत सन 2019 साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षा पार पडली होती.या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी नुकतीच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे.अभिजीत चिखलीकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी चिखलीकर पिता-पुत्राचे अभिनंदन केले आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सुपुत्राने नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत २५२ गुण प्राप्त करून गुणवत्ता यादीत ५९ वा क्रमांक मिळवला आहे.
लोकसेवा आयोगाने आज जाहीर केलेल्या १०४१ उमेदवारांच्या यादीत अभिजीत चिखलीकर यांनी ५९ वा गुणवत्ता क्रमांक मिळवला आहे. अभिजीतने लेखी,शारीरिक चाचणी आणि मुलाखत या तीनही प्रकारात मिळून एकूण २५२ गुण प्राप्त केले आहे.अभिजीतने आपल्या यशाचे श्रेय आई वडीलांसह शारीरिक चाचणीचे शिक्षक एजाज सरांना दिले आहे.
यावेळी यशाला गवसणी घातल्यानंतर बोलतांना अभिजीत चिखलीकर म्हणाले,आपण विद्यार्थी असताना अनेक लोकांच्या अनेक अडचणी पाहिल्या आहेत.सुदैवाने वडीलच द्वारकादास चिखलीकर हे पोलीस खात्यात असल्यामुळे मला समाजाची सेवा करण्याची ईच्छा होती व घरच्यांनीही माझ्या इच्छेला पाठबळ दिले.त्यामुळे मी माझ्या यशाचे सर्व श्रेय आई सौ.स्मिता आणि वडील श्री.द्वारकादास चिखलीकर यांना देतो असे म्हणाले.
ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाची सेवा करण्यासाठी लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा उपयोग करणार असल्याचं मत देखील अभिजीत चिखलीकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले आहे. अभिजीतच्या या यशामुळे चिखलीकर कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.