किनवट: मागासलेल्या डोंगराळ तालुक्याला भविष्यात लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्यभर पुढाकार घेणारे निस्वार्थ जनसेवा करणारे तालुक्याचे शिल्पकार स्वर्गीय उत्तमराव राठोड हे होते असे मत युवा नेते संजय सिडाम यांनी व्यक्त केले.
उत्तमराव राठोड आदर्श विद्यालय गोकुंदा येथे माजी मंत्री ,माजी खासदार उत्तमराव राठोड यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक संजय सिडाम होते. तर मंचावर मुख्याध्यापक श्रीमती गेडाम मॅडम सहशिक्षक रमेश ढाले, राजेश राठोड, के विशाल, सुरेश मुंडे, गोपाल व्यवहारे, सहशिक्षिका अनुसया कुरसांगे , वैशाली वाघमारे, वैशाली भगत हे होते .पुढे बोलताना संजय सिडाम यांनी किनवट माहूर तालुक्याती शैक्षणिक सुविधा ,आरोग्य सुविधा, उच्च शिक्षणाची सुविधा ,नवीन रस्त्याची बांधणी, सिंचनाची सुविधा तसेच विविध शासकीय कार्यालय उभारण्याचे कार्य निस्वार्थपणे स्वर्गीय राठोड साहेबांनी केले खऱ्या अर्थाने आम्ही त्यांनी केलेल्या कार्यामुळे जिल्ह्यापासून 150 किलोमीटर अंतरावर असून सुद्धा सर्व सोयी सुविधेचा लाभ आम्हाला मिळत असून हे स्वर्गीय राठोड साहेबांची आम्हाला दिलेली देन आहे असे ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वी साठी सुरज मुंडे, हरिदास ढाके, दर्शन राठोड, आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह आदी उपस्थित होते
निस्वार्थ जनसेवा करणारे तालुक्याचे शिल्पकार स्वर्गीय उत्तमराव राठोड होते – युवा नेते संजय सिडाम
420 Views