KINWATTODAYSNEWS

शंकर गणपत राठोड यांनी भारतीय सैनिकात हैद्राबाद , पुणे , जम्मु , आसाम , गुहाटी या ठिकाणी प्रमाणिक पणे १७ वर्षे देशाची सेवाकरून ते सेवानिवृत

किनवट (ता.प्र.)
तालुक्यातील धानोरा तांडा येथील शंकर गणपत राठोड यांनी भारतीय सैनिकात हैद्राबाद , पुणे , जम्मु , आसाम , गुहाटी या ठिकाणी प्रमाणिक पणे १७ वर्षे देशाची सेवाकरून ते सेवानिवृत झाले .त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा ७ मार्च रोजी त्यांच्या जन्म गावी संपन्न झाला .
शंकर राठोड सेवा निवृत्त होवून प्रथमच आपल्या जन्म गावी धानोरा तांडा येथे आल्याने गावातील नवयुवक , महीला , पुरुषानी त्यांचे धानोरा रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वेतून उत्तरताच फटाक्याची अतिषबाजी करून मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. रेल्वे स्टेशन ते धानोरा तांडा पर्यंत डीजे ,ढोल ताशाच्या गजरात उघड्या जिप मधून त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला . त्यांच्या कार्याचे गुणगौरव करणारे मनोगत छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी धानोरा चे संस्थापक सुरेश पाटील सोळंके , पो.पा. सं . अध्यक्ष शिवराम जाधव व बापुसाहेब तुप्पेकर मांडले .
सत्कारास उत्तर देताना शंकर राठोड म्हणाले की , आपले करिअर घडविण्यासाठी ध्येय निश्चित करून परिश्रम घेतल्यास यश मिळते .नवयुवकानी भारतीय सैन्यामध्ये जाण्याचे ध्येय निश्चित करावे त्यासाठी लागणारे सहकार्य करण्यास मी तयार आहे .
यावेळी सर्व गावकरी जलधरा जि.प .गटाच्या सदस्या कमलताई हुरदुके , जेष्ट पत्रकार गंगाराम गडमवार, पत्रकार इश्वर जाधव ‘ सरपंच तुकाराम कोकाटे, राजेश नेमानिवार , आनंद सोनटके , रामराव मोरतळे , यांच्या सह पाहूणे मंडळी , मित्र मंडळी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार इश्वर जाधव यांनी केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरंविद नाईक , किशन राठोड , खंडू जाधव , इंदल जाधव, दत्ता जाधव , दुल सिंग राठोड यांनी परिश्रम घेतले .

615 Views
बातमी शेअर करा