मुखेड तालुका प्रतिनिधी (अशोक लोणीकर )
मुक्रमाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोणीकर यांची लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघनेच्या नांदेड जिल्हा प्रवक्ते पदी निवड करण्यात आली असुन लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांच्या हस्ते नांदेड येथील कार्यालयात निवडीचे नियुक्तीपञ देण्यात आले.
यावेळी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे नांदेड जिल्हाउपाध्यक्ष रज्जाक कुरेशी , जलील पठाण मुन्ना सुवर्णकार, गणेश अकुलवार, आदिची उपस्थिती होती.लोकस्वराज्य आंदोलन ही सामाजिक संघटना असुन संपुर्ण महाराष्ट्रात संघनेचे काम जोरात सुरु असुन प्रत्येक जिल्ह्यात नव्याने संघटनेची कार्यकारणी होत असुन त्याचाच एक भाग म्हणून मुक्रमाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोणीकर यांच्या सामाजिक चळवळीतील योगदानाची दखल घेऊन त्यांची लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेच्या नांदेड जिल्हा प्रवक्ते पदी नियुक्ती केली असुन शोषणमुक्त समाज निर्मीतीसाठी व संघटन वाढविण्यासाठी तसेच समाजहितासाठी कार्य करावे असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांनी यावेळी सांगितले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या निवडीबद्दल उपसरपंच सदाशीव बोयवार, मा.ग्रा.प.सदस्य दादाराव गुमडे, ग्रा.प.सदस्य हेमंत खंकरे, ग्रा.प.सदस्य सय्यद जलालोद्दीन, मा.ग्रा.प.सदस्य मनोज जाधव, शिवशंकर पाटील कलंबरकर, दत्ता पाटील माळेगावे, शाकेर काझी, मल्लीकार्जुन खळुरे, मन्मथ खंकरे, बालाजी घंटेलवाड, पृथ्वीराज गुमडे, राजरत्न गुमडे, , सुनील बोयवार, प्रा.प्रल्हाद गायकवाड, संजय राचलवार, ज्ञानेश्वर राजुरे, आदिनी अभिनंदन केले आहे.
लोकस्वराज्य आंदोलन सामाजिक संघनेच्या नांदेड जिल्हा प्रवक्ते पदी अशोक लोणीकर यांची निवड
122 Views