*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6.जिल्यातील नायगाव बाजार पेठेतील एका व्यापाऱ्याने आपले दुकान चालवण्यासाठी ओळखीच्या व इतर सावकारांकडून व्याजाने लाखो रुपये घेतले ते वापस देण्याच्या टाईमला मला सावकार मंडळी छळ करीत आसल्याने आपण परिवारासह आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ वायरल केला कर्जाच्या वसूली साठी तगादा करणाऱ्या मंडळीचे दणाणले धाबे आहेत.
जिल्यातील नायगाव बाजार पेठे मधील एका दुकानदाराने खाजगी सावकारी कर्ज वसुली साठी नायगाव शहरा बरोबरच नरसी,देगलुर व नांदेड येथील बे कायदेशीर व्याज बटीचा व्यवसाय करणारी सावकार मंडळी छळ करीत आसल्याने आपण परिवारासह आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ वायरल केल्याने कर्जाच्या वसूली साठी तगादा करणाऱ्या मंडळी चे धाबे दणाणले आहे.
या व्यापाऱ्याने घेतलेल्या आक्रमक पवित्र्या मुळे अनेकांची झोप उडाली आहे.सदर व्यापाऱ्यानी या बाबदची तक्रार मंत्रालया बरोबरच पोलीस यंत्रणा व उपनिबंधक यांच्या कडे केल्याचे सागंण्यात आले.
जवळपास अठरा व्यापाऱ्या कडून व्याजाने लाखोची रक्कम घेणारे साईनाथ गुंडाळे मागील आठ दिवसा पासून शहरात व दुकानात नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.या बाबद या व्यापाऱ्यास व्याज बट्टीने लाखोच्या रक्कमा देणाऱ्या व्यापाऱ्या बरोबरच शहरातील जवळ पास साठ ते सत्तर व्यापाऱ्याच्या उपस्थित बाजार समिती येथे बैठक घेण्यात आली. ज्या लोकांनी व्याजाने रक्कामा दिल्या त्यातील निमे हे गुंडाळे यांचे जवळचे नातलग आहेत हे विशेष.
सदर आत्महत्या करण्याची धमकी देणारा गुंडाळे हा व्यापारी कोटीच्या वर रक्कम अनेक लोकांकडून व्याजाने घेतली आहे. ती परत न करता वसुली साठी तगादा लागणाऱ्या प्रदिप देमेवार, गौस,गणेश पाळेकर सह अठरा व्यापार्यांची नावे टाकुन आत्महत्या करण्याची धमकी दील्याने आपले काही खरे नाही म्हणत बच्चावत्मक पवित्रा घेण्यासाठी व्याजाने रक्कम देणाऱ्या पाळेकर या व्यापाऱ्याच्या पुढाकारातुन सदर बैठक वाॅटसप च्या माध्यमातून घेण्यात आल्याचे सागंण्यात आले.
या बैठकीस आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सतिश मेडेवार,माजी अध्यक्ष विनोद गंदेवार,उपाध्यक्ष गजानन चौधरी,चंद्रकात कवटीकवार,सतिश लोकमलवार, कांडाळकर, साईनाथ मेडेवार,साईनाथ वट्टमवार,काशेटवार,बेद्रीकर, चल्लावार,व्यकंट देमेवार, चल्लावार,माजी पं.स.सदस्य हानमंतराव चव्हाण सह अनेक नामंकीत व्यापार्यानी हजेरी लावली होतो. व्यापाऱ्यानी घाबरून न जाता कायदेशीर सल्ला मसलत करावी कोणाच्या जिवावर बेतेल असा व्यवहार करू नये असा सल्ला चव्हाण यांनी या वेळी दिला.
व्यापारा साठी खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांकडून व्याजाने पाच-पन्नास लाख, कोटी ची रक्कम अनेक सावकारा कडून घेतल्या नंतर दाम दुपट्टीने परत केल्या नंतर ही हिशोब चुकता होत नसल्याने व वसुली साठी सदर मंडळी तगादा लावत आसल्याने आत्महत्या करण्याची धमकी या पुर्वी अनेक व्यापाऱ्याने दिली आहे.अशा काही मंडळीनि वसुली साठी तगादा व वारं वार अपमान होत असल्याने आत्महत्या करण्याच्या घटना शहरात घडल्याने,अनेकाना पोलीस कार्यवाही ला तोंड द्यावे लागले.
काही लोकांनी घेतलेले लाखो रुपये बुड विण्यासाठी हा धमकीचा फार्म्यूलाचा वापर सुरू केला आसल्याने अनेक सावकारी करणाऱ्या व्यापाऱ्याना मोठा फटका बसला पण त्यांनी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी तो सहन केल.
अशा लोकामुळे वेळ-काळेला व्यवसायाला उभारी देण्यासाठी कमी व्याजाने रक्कमा देवुन सहकार्य करणार्या शहरातील नामांकित मंडळीनि हा देण्या घेण्याच्या व्यवहारच बंद केल्याने अनेकाना अडचणीलाही समोर जावे लागत आहे.काही महिन्यांपूर्वी नांदेड नायगाव येथील उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने नायगाव येथील या प्रकरणात ही गुतंलेल्या लोकांच्या घरी व दुकानात धाडी मारून कागदपत्रे जप्त केली होती पण या प्रकरणात बड्या मंडळींनी हस्तक्षेप केल्याने कोणावर ही कार्यवाही होवू शकली नाही.
धाड प्रकरणात या प्रकरणात गुंतलेल्या चा लोकांचाही सहभाग होता. गरजेला हात जोडून उधार उसन वारी व्याजाने व्यवसायासाठी रक्कम घ्यावयाची घरे दारे बाधायंची व देण्याची वेळ येताच आत्महत्या करण्याची धमकी देण्याची व तक्रार करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.