KINWATTODAYSNEWS

कोरियन टेक्नो इंडस्ट्रीज, पुणे आणि नवीन अशोकराव राठोड प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी. यांच्या विद्यमानेपीठगिरणी चे वाटप कार्यक्रम

किनवट प्रतिनिधी.०६ मार्च २०२२
कोरियन टेक्नो इंडस्ट्रीज, पुणे आणि नवीन अशोक राव राठोड प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी. यांच्या विद्यमाने आज दिनांक सहा मार्च रोजी काँग्रेस कमिटी कार्यालय किनवट येथे दररोजच्या जीवनात अतिशय महत्त्वाची गरज पूर्ण करणारे यंत्र म्हणजे पीठगिरणी चे वाटप कार्यक्रम काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेते तथा शहराध्यक्ष व्यंकटराव जी नेमानी वार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सदर कार्यक्रमास नवीन राठोड प्रदेश उपाध्यक्ष, ओबीसी विभाग, माहूर चे माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे,माजी ता.अध्यक्ष नारायणराव सिडाम, माजी नगरसेवक रहेमत भाई, गिरीश जी नेमानीवार, अभय महाजन तालुकाध्यक्ष, ओबीसी विभाग, सुभाष बाबू नायक, दिलीप पाटील, लक्ष्मीपती दोनपेलिवर, महिला अनुसूचित जातीच्या उपाध्यक्ष प्रीती मुनेश्वर, शेख नर्जहा, शेख परवीन, निर्मलाताई कुमरे, शैख शादुल्ला भाई, माधव खेडकर, कार्यालय सचिव आदी पदाधिकाऱ्यासह लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.


दैनंदिन जीवनात चक्की गिरणीचे महत्व लक्षात घेऊन कंपनी आणि नवीन राठोड यांनी ग्रामीण भागातील दिवसभर काम करून घरी परत आल्यानंतर दळण्यासाठी बाहेर न जाता आपल्या घरी प्रत्येक धान्य ,मसाला ,बेसन हे घरीच दळून घेता आले पाहिजे व त्यातून रोजगार उपलब्ध होतो ही गरज लक्षात घेऊन केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची शिकवण गरिबांच्या सुख-दुःखात धावून जा, त्यांना मदतीचा हात द्या, त्यांचं दुःख कमी करा अशी असल्याने हाच आदर्श घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे नवीन राठोड प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. देशाचे माजी संरक्षण मंत्री शंकराव चव्हाण, माननीय नामदार अशोकराव चव्हाण हे सदैव ग्रामीण कष्टकरी, उपेक्षित, एकनिष्ठ कार्यकर्ता, अथवा व्यक्तीच्या सोबत राहून त्यांना उभारी देण्याचे काम केले आहे. शेवटच्या माणसाचा विचार करणारे हे काँग्रेसची परंपरा आहे, म्हणून आपण सदैव आपल्या सोबत राहतील त्यासाठी युवक युतीने काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठेने जोमाने काम करा. अशोकराव चव्हाण साहेब हे आपल्या सोबतच आहे किनवट तालुक्या कडे त्यांचे गांभीर्याने लक्ष असल्याचे अध्यक्ष भाषणात व्यंकटराव जी नेमानी वार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊलवार , सर, यांनी नियोजनबद्ध केली तर आभार अभय महाजन यांनी केले. यंत्राचे डेमो दाखवून लाभार्थी रंजना रमेश गाढे, शिवाजी जेठे, नितीन प्रेमसिंग जाधव, अप्पा भंडारे किनवट सह एक अशी पाच पीठ गिरणी यंत्र वाटप करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

290 Views
बातमी शेअर करा