जिवती: कोरोना काळात एक लक्ष रुपये निधी जमा करून सर्वांपुढे आदर्श ठेवणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा टेकामांडवा पं स जिवती या शाळेने नेत्रदीपक असा सुंदर आणि उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम व माजी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा असा दुहेरी कार्यक्रम आयोजित करून पुन्हा एकदा आदर्श शाळेचे उदाहरण सर्वांसमोर घालून दिले आहे।
कोरोणा काळात माजी विद्यार्थ्यांनी शाळेला एक लक्ष रुपयांचा मदतनिधी दिला होता त्यावर टेकामांडवा शाळेने कात टाकून नवीन रुपाने आदर्श शाळेकडे वाटचाल केली आहे। जिल्ह्यात सुरू असलेल्या मिशन गरुडझेप मध्ये या शाळेचा समावेश आहे। मा मिताली सेठी मॅडम (मु का अ),मा दीपेंद्र लोखंडे साहेब(शिक्षणाधिकारी,प्राथ) यांच्या प्रेरणेतून मिशन गरुडझेप या कार्यक्रमाचा भाग व पालकांची मागणी यामुळे या वर्षी जिल्हा परिषद शाळेमध्ये सुंदर आणि अतिशय दर्जेदार असा जल्लोष चिमुकल्यांचा, अविष्कार कलागुणांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता। याच कार्यक्रमात या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा व्य स चे अध्यक्ष बळवंतराव नरोटे हे होते तर उद्घाटक म्हणून याच गावातील माजी विद्यार्थी राहुल तांबरे (आर एफ ओ) हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून सुनील कोहपरे केंद्रप्रमुख, एल एम पवार, वैशाली वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते। उद्घाटक राहुल तांबरे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना कला क्रीडा व स्पर्धा परीक्षांचे महत्त्व सांगितले, सुनील कोहपरे यांनी येणाऱ्या काळात टेकामांडवा शाळा सर्वांसाठी आदर्श ठरेल असे उद्गार काढले। यावेळी या शाळेतील शासकीय सेवेत असलेल्या माजी विद्यार्थी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच शाळेतून चि ज्ञानेश्वर सलगर व कु पल्लवी सुरनर या दोन विद्यार्थ्यांचा बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर म्हणून सन्मान करण्यात आला। या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कोळी गीते, टिपरी नृत्य, ओडिसी नृत्य, देशभक्ती गीते, बालगीते ,शेतकरी गीते,लावणी, पारंपारिक गीते अशा बहारदार वैयक्तिक व सामूहिक नृत्यांचा व नाटिकांचा अंतर्भाव करण्यात आला होता। गावातील पालक वृंद व गावकरी यांनी जल्लोष चिमुकल्यांचा, अविष्कार कलागुणांचा या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला व शाळेला मदतही केली।यशवी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मा पेंदाम साहेब(बीडीओ), चरणदास कोरडे(शिवीअ) यांनी शाळेचे अभिनंदन व कौतुक केले।
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गोतावळे सर यांनी केले तर प्रास्ताविक किसन बावणे यांनी केले, कार्यक्रमाचे आभार रुपेश मांदाळे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दत्ता दोरे, उषा डोये,मुखळा मल्लेलवार, दीपिका सोलनकर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले।