KINWATTODAYSNEWS

रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर आयोजित भव्य बॅडमिंटन स्पर्धा

किनवट (प्रतिनिधी)
रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूर महाराष्ट्र आयोजित नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पहिल्यांदाच शासकीय कर्मचारी,व्यापारी व शालेय विद्यार्थ्यांसाठी शनिवार रविवार दि.12/03/2022 व 13/03/2022 तालुका क्रीडा संकुल,किनवट जि.नांदेड येथे
भव्य खुल्या डे-नाईट बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सदर स्पर्धेचे उद्घाटक व बक्षीस शुभहस्ते म्हणून कीर्तिकुमार पूजार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किनवट कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड (अध्यक्ष रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूर)तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विजय डोंगरे उपविभागीय पोलिस अधिकारी(डीवायएसपी),डॉ. मृणाल जाधव तहसीलदार किनवट, अभिमन्यू साळुंके पोलीस निरीक्षक किनवट, सुभाष धनवे गटविकास अधिकारी पं.स किनवट, अनिल महामुने गटशिक्षणाधिकारी किनवट हे उपस्थित राहणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक मारोती भोसले (उपाध्यक्ष)सुनील लासुरे (सहसचिव)रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जि.लातूर {महाराष्ट्र} यांनी दिली आहे.
सदर बॅडमिंटन स्पर्धा ह्या दुहेरी प्रौढ व शालेय विद्यार्थी गटात होणार आहे. या स्पर्धेसाठी संजय कांबळे केंद्रप्रमुख खंबाळा व चांदोबा गायकवाड मुख्याध्यापक के.एम.पाटील माध्य.विद्यालय माळबोरगाव यांच्याकडून प्रथम पारितोषिक 5001, संजय तलवारे-अध्यक्ष कृष्णकांत सुंकलवाड-सचिव लसकमा,किनवट यांच्याकडून तृतीय पारितोषिक 3001,तर ज्ञानेश्वर पानधोंडे प्रोप्रा. गुरुमाऊली स्पोर्ट्स,किनवट यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक 2001 देण्यात येणार आहे. सदर बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम,द्वितीय,तृतीय पारितोषिकची आकर्षक ट्रॉफी,तसेच सामनावीर,मालिकावीर,बेस्ट शूटर,बेस्ट डिफेन्सर या सर्व ट्रॉफी स्व.अनिलभाऊ (जॉन्टी) बापूराव कोरडवार यांच्या स्मरणार्थ प्रशांत कोरडवार यांच्या तर्फे देण्यात येणार आहे.सदर स्पर्धेसाठी संजय नेम्मानीवार,प्रवीण म्याकलवार,माजीद खान अभय महाजन,माधव नागरगोजे,उत्तम जोंधळे रविकांत घोणशेटवार,नारायण चंदनकर,प्रशांत शेरे,विष्णु मुनेश्वर,रामराव जाधव, कविराज घुले, धनंजय नाईकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे

390 Views
बातमी शेअर करा