KINWATTODAYSNEWS

ग्रामपंचायत गोकुंदाचा कारभार वाऱ्यावर!जिकडे तिकडे तुंबल्या नाल्या, दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर;नागरिकांचे बेहाल

गोकुंदा/ प्रतिनिधी: गोकुंदा ही किनवट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या गावात ग्रामपंचायत कडे शेकडो कोटी या ग्रामपंचायत ला अनेक योजना तुन विकास निधी मिळत असतात. परंतु या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक किंवा प्रशासक विविध समस्यांकडे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. गत अनेक दिवसापासून गोकुंदा ग्रामपंचायत येथील वार्ड वाऱ्यावर सोडले असून वार्ड मध्ये जिकडे तिकडे नाल्या तुंबलेल्या दिसून येत आहेत.

गोकुंदा येथील नागरिकांचे बेहाल तुंबलेल्या नाल्या;रस्त्यावर कचरा.

तसेच दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर आलेला आहे व त्यावर डुकरांचे खेळ सुरू आहेत. अशा परिस्थितीत लहान मुल, वृद्ध व स्त्रियांना चालणे मुश्किल होऊन बसले आहे. या समस्येकडे पंचायत समिती प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या ठिकाणच्या ग्रामसेवक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना ताबडतोब लक्ष देण्याची साठी सूचित करावे असे येथील रहिवासी व समाजसेवक तथागत गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितले. अन्यथा लवकरच सामान्य नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी शेवटी सांगितले.

711 Views
बातमी शेअर करा