*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.5.लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय,धर्माबाद येथिल महाविद्यालयातील कार्यरत असलेले वरिष्ठ विभाग, कनिष्ठ विभाग,एमसीव्हीसी विभागातील प्राध्यापक सभासद आणि शिक्षकेत्तर विभागातील सभासद असलेल्या लालबहादूर शास्त्री कर्मचारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित धर्माबाद.या पतसंस्थत एकूण अकरा निर्वाचित संचालकांची मान्यता आहे. या महाविद्यालयाच्या पतसंस्थेची 2 मार्च 2022 रोजी पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली.या निवडणुकीत महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या पतसंस्थेवर संवर्गनिहाय बिनविरोध संचालक मंडळाची निवड केली. त्यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयातील डॉ.प्रतिभा येरेकर डॉ.नितेश कामींनवार,प्रा.कुलदीपक गच्चे कनिष्ठ महाविद्यालयातील डॉ. बालाजी श्रीगिरे प्रा.सुधाकर कासरलावाड,एमसीव्हीसी विभागातील डॉ.मोईन शेख, डॉ.संजय पवार यासह शिक्षकेत्तर विभागातून सुभाष गोजे,डॉ.रिंकू नक्का मारुती डेबेकर आणि मारुती जगदंबे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली.या एकूण अकरा संचालका पैकी पत संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी सहाय्यक निबंधक अधिकारी निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते.यांच्या उपस्थित अध्यक्षपदी प्रा डॉ. प्रतिभा येरेकर,उपाध्यक्ष मारुती डेबेकर,सचिव प्रा.डॉ.संजय पवार कोषाध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.बालाजी श्रीगिरे यांची बिनविरोध निवड करण्यात झाली आहे.या सर्वांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.पी.सुशीला उपप्राचार्य वसुंधरा वडवळकर,स्टाफ सेक्रेटरी डॉ.सुनीलचंद्र सोनकांबळे, डॉ.योगेश जोशी,डॉ.कमलाकर कणसे,डॉ.प्रभाकर जाधव,डॉ.राजू रांदड,डॉ.हणमंत कासराळीकार,प्रा.नक्कलवार, प्रा.राजेंद्र साळी,कार्यालयीन अधिक्षक अनंत तोटेवाड,गणेश जाधव यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय कर्मचारी सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व नवनिर्वाचित संचालकाचे आणि कार्यकारी मंडळाचे अभिनंदन केले आहे.