KINWATTODAYSNEWS

लोणी खुर्द येथे मातंग समाजावर टाकण्यात आलेला बहिष्कार हटवा * त्यांना मुलभुत सुविधा पुरविण्या बाबत समता परिषदेचे तहसीलदाराना निवेदन

मालेगाव ता 4 – लोणी खुर्द येथे मातंग समाजावर टाकण्यात आलेला बहिष्कार हटवा तसेच त्यांना मुलभुत सुविधा पुरविण्या याव्यात अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,
लोणी खुर्द ता.रिसोड जि.वाशिम येथील मातंग समाजातील महिला, पुरुष व बालकांना घरात घुसुन मारहान केली व त्यांना बहिष्कृत केले. त्यांच्या घरांचा विज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे.
किराणा दुकानदार, पिठगिरणी चालक हे काही गावकऱ्यांच्या दहशतीमुळे किराणा माल व दळन ही देत नाहीत. तसेच मातंग समाजातील महिला व पुरुषांना मुख्य रस्त्याने जाणे कठीण झाले आहे.
त्यामुळे त्या समाजावरील बहिष्कार हटवुन त्यांना मुलभुत सुविधा पुरविण्यात याव्यात तसेच कुरहा,मांडवा, जवळा, कापडशेंगी हा कुरहा गावावरुन लोणी खुर्दला आलेला रस्ता गजानन महाराज
मंदिरा जवळुन दक्षिणेकडुन मातंग वरतीचे पाठी मागुन चिंची जवळुन गावाचे बाहेरुन तिर्थक्षेत्र लोणीला जाणारा गावाला वडण मार्ग द्यावा जेणे करुन गावातुन जाण्याची गरज पडणार नाही.
मातंग वस्तीसाठी स्वतंत्र सिंगल फेज डि.पी.यावी. कायम स्वरुपी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी, त्यांना पिठ व किराणा माल गावात मिळेल याची व्यवस्था करुन द्यावी पिडीतांचे वारसांना
शासकीय नोकरीत सामावुन घ्यावे.
पुरोगामी महाराष्ट्रात मातंग सामाजावर बहिष्कार टाकल्या जाणे दुर्दैवी आहे. त्यामुळे त्यांच्यावरील बहिष्कार मागे घेऊन त्यांना मुलभुत सुविधा देण्याबाबत संबंधीतांना आदेश देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
निवेदन देते वेळी समता परिषदेचे विभागीय अध्यक्षप्रा.अरविंद गाभणे जिल्ह्य सहसचिव यशवंत हिवराळे जिल्हा उपाध्यक्ष सेवाराम आडेजिल्हा उपाध्यक्ष विलासराव रोकडे चंद्रकांत गायकवाड ,माजी सैनिक अशोकराव घुगे अमर गाभणे आदी उपस्थित होते.
– नायब तहसीलदार केंद्रे यांना निवेदन देण्यात आले.

196 Views
बातमी शेअर करा