नांदेड ( वृत्तसेवा ) :
उन्हाची वाढती तीव्रता पाणी टंचाई व शाळांमध्ये भौतिक सुविधांच्या अभावामुळे दरवर्षीप्रमाणे इतर जिल्ह्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील शाळा हे सकाळ सत्रात भरव्यात अशी मागणी इंडियन बहुजन टीचर्स असोशियन ( इब्टा ) या महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनेच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे मॅडम, शिक्षण सभापती संजय बेळगे , शिक्षणाधिकारी सविता बिरगे मॅडम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन (इब्टा ) च्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उन्हाची वाढती तीव्रता शाळेत पंखे व इतर भौतिक सुविधांचा अभाव व पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. संपामुळे बस सेवा बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थी नजिकच्या गावात पायपीट करीत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थी व शिक्षकांना उष्माघाताचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तेव्हा दरवर्षीप्रमाणे इतर जिल्ह्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील शाळाही सकाळ सत्रात सकाळी नऊ ते एक भरविण्यात याव्यात अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सदरील निवेदनावर इब्टाचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे , कार्याध्यक्ष बालाजीराव थोटवे , बबनराव घोडके , निलेश गोधने , नागनाथ यरमलवाड , सदाशिव माने, रमेश मुनेश्वर , या अशोक कागेरु , देविदास नारमोड , प्रमोद कांबळे , विरभद्र मिरेवाड , उत्तम गायकवाड , विजय इंदुरकर, जगन्नाथ दिंडे , उत्तम गायकवाड , रामदास गोणारकर , बळीराम कदम , गोविंद वाघमारे , जे. जी.कांबळे, दिलीप पांचाळ , कुमारस्वामी माने , मिलिंद राऊत, दशरथ कांबळे, मोहन सावते, मिलिंद जाधव , जितेंद्र गवळे, मोहन सीताफुले , शेख नसीर , माधव अंभोरे , मिलिंद दरबारे , आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत