KINWATTODAYSNEWS

लिंगी मार्गे पिंपळशेंडा आठ किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल चार कोटी मंजूर… आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते भूमिपूजन

किनवट प्रतिनिधी: तालुक्यातील विकासापासून कोसो दूर दुर्लक्षित गाव मौजे पिंपलशेडा स्वतंत्रता मिळण्यापूर्वी पासून समस्येच्या गर्तेत असून शासनाच्या विकास धोरणा पासून वंचित आहे. परंतु येथील नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने आमदार भीमराव केराम यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन येथील मुख्य रस्ता पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा चालविला होता त्याचेच फलित सदर रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये समाविष्ट होऊन आठ किलोमीटर साठी तब्बल चार कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला असून आमदार भीमराव केराम प्रकृती अस्वस्थतेमुळे विश्रांती घेत असल्याने नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर आज दिनांक चार मार्च रोजी भूमिपूजन पार पडले.

पिंपळशेंडा येथील रस्त्याचे शासकीय स्तरावर भूमिपूजन करण्यासाठी तालुक्यात आलेले जिल्हाधिकारी,सहायक जिल्हाधिकारी,जिल्हाधिकारी(परिक्षविधिन)एस. कार्तिकेयन यांनी आमदार भीमराव केराम यांचे निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.प्रकृतीची विचारपूस केली.

गेल्या अनेक वर्षापासून गांवकुसाबाहेर शेवटच्या टोकाचे गांव पिंपळशेंडा या ठिकाणी दळणवळणना करिता रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी अनेक लोकप्रतिनिधी कडे केली होती. परंतु येथील जनतेच्या हाती निराशेशिवाय दुसरे काहीच लागले नाही.जनतेच्या मागणी नुसार त्यांना सोई सुविधा मिळवून देण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी नांदेड़ चे कर्त्तव्य दक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर,आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पूजार यांच्या कड़े सातत्याने पाठपुरावा करून सदर भागाची प्रत्यक्ष पाहणी करून वन विभागाशी समन्वय साधुन सदर प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविली होती त्याचेच फलित पिंपळशेंडा गावचे सुमारे 8 कि.मी. काम लिंगी मार्गे साढ़े चार कोटी रुपये निधी मुख्यमंत्री सड़क योजनेतून मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी पालकमंत्री नामदार अशोक चव्हाण यांना निमंत्रित करण्यात होते त्यांनी येण्याचे मान्य ही केले परंतु सद्या अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असल्याने त्यांची उपस्थिति शक्य नसून आमदार भीमराव केराम यांची प्रकृति ठीक नसल्याने सदरिल लोकहिताचे काम सुरु करण्यासाठी संबधीत यंत्रणस सूचना केली होती त्यावरून आज डॉ.विपिन ईटनकर,आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पूजार व परिविक्षाधीन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते सदर रस्त्याचे भूमिपूजन झाले असून हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री यांचे हस्ते लोकार्पण करण्यात येणार असून सदरिल प्रस्तावित कामास मुख्यमंत्री सड़क योजनेचे कार्यकारी अभियंता श्री नीला यांचेही ही मोलाचे सहकार्य लाभले असून आमदार भीमराव केराम यांनी पालकमंत्री व सर्व प्रशासन यंत्रनेचे हा रस्ता मंजूर केल्याबद्दल व प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

1,054 Views
बातमी शेअर करा