*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.1.जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील बहू चर्चीत बाबळी बंधाऱ्यातील पाणी साठ्यातून एक मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत आठ दरवाजे उघडून0.6 टीएमसी पाणी तेलंगणा राज्यातील श्रीराम सागर (पोचमपाड) ला सोडण्यात आले.
तेलंगाना पूर्वी चा आंध्र प्रदेश व महाराष्ट्र सीमेवरील वादग्रस्त बाभळी बंधारा नऊ वर्षापासून एक मार्च रोजी 0.6 ती एम सी पाणी सोडले जात आहे.मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत दिनांक एक जुलै रोजी सर्व गेट वर उचलले जातात.दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सर्व गेट खाली टाकले जातात.एक मार्च रोजी बंधाऱ्यातील जलसाठ्यात तील 0.6 टीएमसी पाणी सोडणे असा निर्णय दिल्याने त्याच निर्णयाच्या आधिन राहून दिनांक 1 मार्च रोजी0.6 टीएमसी पाणी सोडण्यात आले.
या त्रिस्तरीय समितीत केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता एन.श्रीनिवासराव अप्पर गोदावरी विभाग हैदराबाद, तेलंगाना श्रीरामसागर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. शिवकुमार,महाराष्ट्र नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ये एस चौगुले उपस्थित होते.दिनांक 1 मार्च रोजी बाबळी बंधाऱ्यात 38.23 दशलक्ष घनमीटर पाणी जलसाठा होता. एक मार्च रोजी 0.6 टीएमसी पाणी सोडल्यानंतर21.34 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे.यापुढे जमा झालेल्या पाणीसाठा दिनांक 1 जुलै रोजी सर्व दरवाजे उघडून सोडण्यात येणार आहे.
राज्य शासनाने बाबळी बंधाऱ्यातील एकूण2.74 टीएमसी पाणीसाठा जमा करून सोडून देण्यापेक्षा या जण साठ्याचा शेतकऱ्यांना व नागरिकांना सर्व योजना कार्यान्वित करून या बंधाऱ्याचा जलसा त्याचा फायदा होईल नसता पाण्याचा पैसा गेला वाया अशी शेतकऱ्याची चर्चा आहे. सर्वपक्षीय बाभळी बंधारा कृती समितीने महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा यासाठी प्रयत्न केला असून तो प्रयत्न चालू आहे.
मराठवाडा जनता विकास परिषद जिल्हा नांदेड च्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष माजी खासदार तथा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर वेंकटेश राव कागदे,बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशन गावकर, सचिव डॉक्टर बालाजी कोण पलटवार, सहसचिव जीपी मिसाळे यांनी पुढील लढण्याची चर्चा केली आहे,जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण, तसेच जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुढाकार घेऊन बाबळी बंधाऱ्यातील जलसाठा त्याचा व दरवाजे टाकण्याचा तोडगा काढावा अशी मागणी केली आहे.
एक मार्च रोजी बाबळी बंधाऱ्यावर बंधारे विभागाचे वाहन चालक सय्यद महसूद आली महबूब अली सेवानिवृत्त झाल्याबद्दल निरोप देण्यात आला.याप्रसंगी बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशन गावकर,बाभळी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता यम कानड खेडकर, कनिष्ठ अभियंता एस.बी. देवकांबळे,शाखा अभियंता आर. के.मुक्कावार भोकर, विजतंत्री एल.व्ही.गुडेवार, स.अभियंता डी.एल.पांडे,शिवाजीराव देशमुख,विजय बंडेवार, विजयकुमार गुंजकर,पोलीस विभाग व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते