KINWATTODAYSNEWS

आजच्या या धकाधकीच्या काळात इमानदारी आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे

किनवट/प्रतिनिधी:
मुस्लिम जमात चे साथी किनवट शहरात फिरत असताना एका महिलेचा पर्स रस्त्यात सापडला असता त्यांनी तो पर्सन कोणाचा आहे याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु सदरील पर्स कोणाचा आहे हे त्यांना माहित होत नसल्यामुळे त्यांनी तो पर्स किनवट येथील मौलाना कडे जमा केला.

व मौलानांनी संपर्काचे साधन नसल्यामुळे या पर्स मधील फोटो एका व्हाट्सअप च्या ग्रुप वर शेअर केला व हा पर्स कोणाचा आहे याबद्दल माहिती विचारली असता सदरील पर्स ग्रामसेवक डुकरे यांच्या पत्नीचा असल्याचे समजले लगेच त्यांना फोन करून सदरील माहिती देण्यात आली व तो पर्स मज्जित मधून घेऊन जाण्यासाठी कळविण्यात आले त्यावरून डुकरे व त्यांची पत्नी त्या ठिकाणी येऊन त्यांची ओळख पटवून दिली.व त्यांनी तो पर्स हस्तगत केला त्यामध्ये 25 हजार रोख रक्कम आणि दीड तोळा सोने असे साहित्य या पर्समध्ये आढळून आले. त्यांनी त्या जोडप्यास तो पर्स परत केला आजच्या या धकाधकीच्या काळात इमानदारी आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे हा संदेश या ठिकाणच्या मौलनांनी दिला सदरील पर्स मिळाल्याबद्दल डुकरे परिवार आनंदित झाले व त्यांनी सर्व मौलनांचे मनापासून आभार मानले या गोष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

497 Views
बातमी शेअर करा