किनवट शहर प्रतिनिधी
जय मल्हार प्रतिष्ठान धानोरा (म) ता लोहा जि नांदेड या संस्थेने बचत गटांना कर्ज मिळवून देतो म्हणून किनवट माहूर तालुक्यातील महिला बचत गट व शेतकरी पुरुष बचत गटातील जवळपास सात हजार जणांची फसवणूक करून जवळपास दोन कोटी चा भ्रष्टाचार करून फरार झाल्याप्रकरणी किनवट पोलिसात जय मल्हार प्रतिष्ठान चे विरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोरडे यांनी फसवणुकीचा गुन्हा तात्काळ दाखल करण्याकरिता तक्रार दिली असून यासोबत आजही या प्रतिष्ठानचे दलाल वसुली करत फिरत आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात करण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यातील जय मल्हार प्रतिष्ठान धानोरा म ता लोहा या संस्थेचे संचालक रघुनाथ प्रभू घोडके यांनी किनवट येथे कार्यालय उघडून मोठे नाम फलक लावून मागील अडीच वर्षापासून महिला बचत गट व शेतकरी पुरुष बचत गटाची स्थापना केली या बचत गटांना त्याने प्रत्येक गटाला एक ते दहा लाखापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात कर्ज मिळवून देतो म्हणून किनवट माहूर तालुक्यात प्रसार व प्रचार केला त्याच्या या खोटारड्या आमिषाला बळी पडून किंवा व माहूर तालुक्यातील आदिवासी व मागासवर्गीय महिला पुरुषाने या संस्थेकडे अर्ज करण्यास सुरुवात केली आदिवासी व मागासवर्गीय गोरगरिबांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत या संस्थेने प्रथम सभासद फिश म्हणून 700 रुपये प्रत्येकी फीस घेतली त्यानंतर महिला बचत गट शेतकरी पुरुष गट तयार करण्यासाठी प्रत्येकी सातशे रुपये प्रमाणे जवळपास दोन हजार गटाकडून वसूल केले पुन्हा प्रोजेक्ट रिपोर्ट साठी म्हणून व्यवसायाप्रमाणे पाच हजार रुपये प्रत्येकी घेतले आणि पॅनकार्डसाठी प्रत्येकी दोनशे रुपये घेतले तर व्यवसायिक कर्ज देतो म्हणून कर्ज देण्यापूर्वीच कर्जाच्या स्वरूपाप्रमाणे सात टक्के रक्कम अगोदरच वसूल केली तर प्रत्येक गटाकडून तीन कोरे चेक कर्ज देण्यापूर्वीच घेतले ही प्रक्रिया कर्ज मिळवून देण्याची मागील दोन वर्षापासून सुरू आहे जवळपास सहा ते सात हजार सभासदाकडून प्रत्येकी वेगवेगळ्या स्वरुपाचा कर्जाची फीस वसूल करून जवळपास दोन कोटी रुपये गोरगरीब कडून आदिवासी महिला पुरुषाकडून उकळून फरार झाला मात्र या बचत गटांना मागील दोन वर्षात एकही रुपया मिळाला नाही मागील तीन महिन्यांपासून हे बचत गट कार्यालयात फेटा मारत आहे आणि संस्थाचालक घोडके यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र हा भ्रष्टाचारी घोडके यांची फसवणूक करून फरार झाल्याचे समजते त्यांचे दलाल मात्र अजूनही गरीब आदिवासी बांधवाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहे ही घटना बचत गटांनी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोरडे यांच्याकडे आणल्यानंतर त्यांनी जय मल्हार प्रतिष्ठान चे संचालक यांच्याविरोधात किनवट पोलिसात तक्रार दिली असून रघुनाथ घोडके वर दोन कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ची मागणी केली आहे प्रशांत कोरडे यांची प्रतिक्रिया घेतली असता प्रकरणात तालुक्यातील आदिवासी व मागासवर्गीय महिलांना व पुरुषांना जोपर्यंत न्याय मिळून कर्ज मिळणार नाही अथवा संचालकांविरुद्ध ठोस अशी कारवाई होणार नाही तोपर्यंत तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जनआंदोलन करण्याचा मानस बोलून दाखविला तसेच प्रशांत कोरडे यांनी येत्या गुरुवारी तालुक्यातील सर्वच बचत गटांना किनवट येथे बोलावून आपले म्हणणे पोलीस स्टेशन व सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष माडण्यासाठी या प्रतिक्रिया द्वारे आव्हान केले आहे
जय मल्हार संस्थेने किनवट तालुक्यातील आदिवासी व शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयाला गंडविले गुन्हा दाखल करण्याची प्रशांत कोरडे यांची मागणी
523 Views