KINWATTODAYSNEWS

विचारांचा गोंधळ म्हणजे अपयश तर सुस्पष्ट विचार म्हणजे यश -बालासाहेब कच्छवे #मानसशास्त्रीय समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

किनवट : विचारांचा गोंधळ म्हणजे अपयश तर सुस्पष्ट विचार म्हणजे यश असे प्रतिपादन समुपदेशक बालासाहेब कच्छवे यांनी केले. येथील शासकीय आश्रम शाळेत शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने आयोजित मानसशास्त्रीय समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.
विचारांचा गोंधळ म्हणजे अपयश तर सुस्पष्ट विचार म्हणजे यश -बालासाहेब कच्छवे

#मानसशास्त्रीय समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने होते. द युनिक अकॅडमी पुणेचे गणेश गवळे, माहूरचे शिक्षण विस्तार अधिकारी मुधोळकर , किनवटचे शिक्षणविस्तार अधिकारी संजय कराड आदींची प्रमुख उपस्थिती होती .
पुढे बोलतांना श्री कच्छवे म्हणाले की, ध्येय निश्चित करा केव्हा ? कुठे ? कसे ? याचे नियोजन करा. चांगली पुस्तकं वाचा चांगल्या माणसांच्या – मार्गदर्शकांच्या सानिध्यात जा. मुलांमध्ये न्यूनगंड नसावा सर्वच मुले चांगले आहेत. तीच माणसं ग्रेट आहे जे आपल्या माणसात आनंद पेरतात. यशाचं बीज मनात असावं असेही ते म्हणाले.
शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ कराड यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णुपुरी नांदेडचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. निलेश आळंदकर यांनी उपस्थित विद्यार्थी व मुख्याध्यापकांना तंत्र शिक्षणातील करिअरच्या संधी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. युनिक अकॅडमी पुणेचे कस्टर हेड कपिल हांडे यांनी एमपीएससी आणि युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी, स्पर्धा परीक्षेच्या पाया, मुलाखत देतांना करावयाचे नियोजन आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. माहूरचे शिक्षणविस्तार अधिकारी मुधोळकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करतांना गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी महा करिअर पोर्टलची सविस्तर माहिती देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. राज्य पुरस्कृत शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी सूत्रसंचालन .केले. बी. एम. सूर्यतळे यांनी आभार मानले.
यावेळी युनिक अकॅडमीच्या वतीने शासकीय आश्रम शाळा किनवट, गट शिक्षणाधिकारी कार्यालय किनवट, जिल्हा परिषद हायस्कूल मांडवी, इस्लापूर, कोसमेट, बोधडी, किनवट या शाळांना स्पर्धात्मक पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमास किनवट – माहूर तालुक्यातील मुख्याध्यापक व आश्रम शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

320 Views
बातमी शेअर करा